मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा पेटला, आक्रमक ग्रामस्थांनी केली ऑफिसची तोडफोड

पुण्याचा कचरा प्रश्न पुन्हा पेटला, आक्रमक ग्रामस्थांनी केली ऑफिसची तोडफोड

Pune waste management issue: 'प्रकल्प उभारताना सगळे नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. आजुबाजूच्या परिसरातल्या शेतीलाही नुकसान झालं आहे'

पुणे 01 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा कचरा प्रश्न (Pune waste management issue ) जटील झाला आहे. दररोज शहरातून निघणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंबेगाव इथल्या कचरा प्रकल्पाविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले असून इथे कचरा टाकून देणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रकल्प स्थळावर जाऊन तिथल्या कार्यालयाचीही तोडफोड केली.

पुण्यात जमा होणारा काही कचरा हा आंबेगाव इथं टाकला जातो. त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र या प्रकल्पामुळे गावाचं आरोग्यच धोक्यात आल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हा प्रकल्प तातडीने हटवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या आधीही आंबेगावमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवस कचरा टाकण्यात आला नव्हता. आता पुन्हा कचऱ्याचे ट्रक येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे संतप्त गावकरी तिथे जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर तरुणांनी इथल्या कार्यालयात घुसून सामानाची तोडफोड केली. टीव्ही, एसी, खुर्च्यांसह इतर सामानाची तोडफोड करण्यात आली आहे.

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय केराच्या टोपलीत, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

इथे भाजपचे नगरसेवक आहेत. महापालिकेत सत्ताही भाजपचीच आहे. त्यामुळे नगरसेवकाने पक्षभेद विसरून लोकांच्या हितासाठी महापालिकेत हा मुद्दा लावून धरला पाहिजे असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. महापालिकेच्या हद्दीत काही नवीन गावांचाही समावेश करण्याचं नियोजन असल्याने आता इथे आणखी कचरा टाकण्यात येईल अशी भीतीही गावकऱ्यांना वाटत आहे.

प्रकल्प उभारताना सगळे नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. आजुबाजूच्या परिसरातल्या शेतीलाही नुकसान झालं आहे असं मतही इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलंय.

First published:

Tags: Pune (City/Town/Village)