मराठी बातम्या /बातम्या /पुणे /PHOTOS: देशी वनस्पतींच्या बिया वापरून पुण्यात साकारले अनोखे बीज चित्र

PHOTOS: देशी वनस्पतींच्या बिया वापरून पुण्यात साकारले अनोखे बीज चित्र

बीज चित्राच्या निर्मितीसाठी अनेक राज्यातील वनस्पती अभ्यासक, बीज संवर्धन, बीज संकलक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

बीज चित्राच्या निर्मितीसाठी अनेक राज्यातील वनस्पती अभ्यासक, बीज संवर्धन, बीज संकलक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

बीज चित्राच्या निर्मितीसाठी अनेक राज्यातील वनस्पती अभ्यासक, बीज संवर्धन, बीज संकलक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

पुणे, 16 मे: पुण्यात (Pune) बीज चित्र (Seed Picture) किंवा बीज रांगोळी (Seed Rangoli) या संकल्पनेवर आधारित स्थानिक देशी वृक्षांच्या - वेलींच्या बिया (seeds) आणि फळे (fruits) वापरून ही अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. साकारण्यात आलेले चित्र हे 2021 हजार स्के. फु. इतक्या क्षेत्रफळाचे आहे. कदाचित भारतातील हे पहिले अशा प्रकारचे बीज चित्र असणार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी, आपल्या मातीतल्या बियांचा वापर केला गेला. या बीज-चित्राच्या माध्यमातून जनमानसात बीज संस्कृती रुजावी, स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे, परंपरागत धान्य, कडधान्य, औषधी, खाद्यपयोगी वनस्पती वाणाचे संवर्धन, जतन व्हावे या उद्देशाने या बीज - चित्राची निर्मिती करण्यात आली आहे.

बायोस्फिअर्स, सांस्कृतिक विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे, देवराई संस्था, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान, श्रीकृष्ण ट्रेडिंग, रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी सत्यवीर मित्र मंडळ, आम्ही भोरकर संस्था, सामाजिक वनीकरण, पुणे आणि सह्याद्री इंटर न्याशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्या विकास विद्यालय व प्रशाला क्रीडांगण, सहकार नगर 1, पुणे येथे बीज-चित्र साकारण्यात आलय. गारंबी शेंगेचे वापर करून अनोखा बीज-नाद देखील करण्यात आला.

बीज चित्राच्या निर्मितीसाठी अनेक राज्यातील वनस्पती अभ्यासक, बीज संवर्धन, बीज संकलक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. हरितीकरणाला प्रोत्साहन मिळावे, बियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाश्वत आणि पर्यावरणाला अनुकूल असा विकास व्हावा, हा जैविक ठेवा किंवा वारसा अक्षय्य रहावा या उद्देशाने ही चित्रकृती साकारली गेली आहे.

बीज चित्रासाठी 45 सपुष्प वनस्पतींच्या बिया आणि काही प्रमाणात फळे यांचा वापर करण्यात आला. हे बीज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विषेत: 12 मावळ, चंद्रपूर, सिल्लोड, भीमाशंकर, पुणे जिल्हा, लातुर, उस्मानाबाद, इतर ठिकाणाहून संकलित करण्यात आले होते. यापुढे ही शिव बीज-चित्र संकल्पना इतर अनेक ठिकाणी राबवले जाणार आहे. या बीज चित्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आद्य वृक्षसंवर्धक छत्रपती शिवाजी महाराज, प्राणवायूचा अखंड स्त्रोत असणाऱ्या वृक्षाची छबी, सामाजिक सेवेमध्ये अविरत अशी योगदान देणारे भारताचे अग्रगण्य असे व्यक्तिमत्व रतनजी टाटा आणि सध्या काळाची गरज असणाऱ्या प्राणवायूचा सिलेंडर, या सर्वांचे एकात्मिक मिळून बीज चित्र साकारण्यात आले आहे आहे. या बीज चित्राची संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची आहे.

First published:

Tags: Pune