जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / दे धक्का! ट्रॅफिक पोलिसांनी बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का, पाहा VIDEO

दे धक्का! ट्रॅफिक पोलिसांनी बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का, पाहा VIDEO

दे धक्का! ट्रॅफिक पोलिसांनी बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का, पाहा VIDEO

अचानक ट्रक रस्त्यात रात्रीच्या वेळी बंद पडला. त्यामुळे ट्रॅफिक होऊ लागलं. ही कोंडी सोडवण्यासाठी स्वत: ट्रॅफिक पोलीस पुढे आले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे : ऊन असो किंवा पाऊस मात्र आपली ड्युटी निभावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ट्रॅफिक पोलीस वेळोवेळी लोकांची मदत करतानाचे व्हिडीओ याआधी देखील सोशल मीडियावरून समोर आले होते. आताही पुण्यात चक्क ट्रॅफिक पोलिसांनी ट्रकला धक्का मारून ट्रॅफिक सोडवण्याचे प्रयत्न केले. पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अचानक ट्रक रस्त्यात रात्रीच्या वेळी बंद पडला. त्यामुळे ट्रॅफिक होऊ लागलं. ही कोंडी सोडवण्यासाठी स्वत: ट्रॅफिक पोलीस पुढे आले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रकला धक्का मारला आणि बाजूला केला.

जाहिरात

त्यामुळे बऱ्यापैकी वाहतूक कोंडी सुटली. ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट करत म्हटलं, ‘‘अनपेक्षित अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, परंतु जलद विचार आणि “टीम-वर्क” सह परिस्थिती हाताळता येऊ शकते.’’

News18लोकमत
News18लोकमत

‘‘भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार व स्थानिक नागरिक यांचे कौतुकास्पद काम…! कात्रज चौकात काँक्रीटचा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे ट्राफिक अंमलदार यांनी आजूबाजूला उपस्थित लोकांच्या मदतीने ट्रकला त्वरीत मोठ्या ताकतीने धक्का मारून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात