जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : पुण्यातलं हे गाव आहे शहरापेक्षा भारी, खुद्द राष्ट्रपतींनीही केलं कौतुक GROUND REPORT

Pune News : पुण्यातलं हे गाव आहे शहरापेक्षा भारी, खुद्द राष्ट्रपतींनीही केलं कौतुक GROUND REPORT

पुणे जिल्ह्यातील आदर्श गाव

पुणे जिल्ह्यातील आदर्श गाव

Pune News : पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावानं अनेक शहरांनाही जमणार नाही असं काम केलं आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 5 जून : ‘स्वयंपूर्ण खेडी’ हे महात्मा गांधींजींचं स्वप्न होतं. गांधीजींच्या स्वप्नातील भारातामध्ये ग्राम स्वराज्य ही एक महत्त्वाची संकल्पना होती. त्या संकल्पने गाव स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशातील अनेक खेड्यांनी या दिशेनं वाटचाल सुरू केलीय. या गावांनी स्वयंस्फुर्तीनं विकास करत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी हे यापैकीच एक आदर्श गाव आहे. कसं झालं स्वावलंबी गाव? पुण्यापासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर टिकरेवाडी हे 1100 लोकसंख्या असलेलं छोटसं गाव आहे. पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावानं देशात अनेकांना जमलं नाही, असं काम केलंय. टिकरेवाडी ग्रामपंचायतीनं ओला कचरामुक्त गाव हे ध्येय निश्चित ठेवून कामाला सुरूवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

लहान-मोठ्या गावांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरकारी इमारतीवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याची सरकारी योजना आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसंच ग्रामपंचायतीच्या सहभागातून ही योजना राबवण्यात येते. या सोबचतच गावातील रिकाम्या जमिनीवरही गोबर गॅस प्लँट उभे करण्यात आलेत. ज्या गावामधेये नदी, ओढे तुडुंब भरुन वाहतात त्या गावाचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी विचार केला जातो. ज्या मुलाला पुस्तकं घेऊन दिली, त्याच्यासोबतच दिली दहावीची परीक्षा, आई झाली 51 टक्के घेऊन पास, Video टिकरेवाडीच्या ग्रामपंचायतीनं या योजनांचा फायदा घेतला.  या ग्रामपंचायतीनं गावातच गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुरू केला.या प्रकल्पाच्या सर्व कुटुंबांना गोबर गॅस उपलब्ध झालाय. त्याचबरोबर शेती आणि शेतमालही खतांच्या विरहीत फुलू लागलाय. त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही वाढ झालीय. ‘गावचा कारभार विनाखर्च व्हावा यासाठी गावाने वीज बचतीचं धोरण हाती घेतलंय. या माध्यमातून गावात सोलर प्रकल्प उभारण्यात आले आहेत.  गावातील पथदिवे, शाळा मंदिर,पाणी योजना यासाठी लागणी वीज सौरऊर्जेतुन तयार केली आहे. वीज बील मुक्त ग्रामपंचायत हे आमचे ध्येय होते. प्रत्येक घरावर सोलार युनिट उभं करून प्रत्येक घराला गरम पाणी दिलं जात आहे. या माध्यमातून फक्त गरम पाण्यासाठी वापरण्यात येणारा 10 ते 12 हजार टन लाकूडफाटा वाचवण्यात आम्हाला यश आलाय ’ असं टिकरेवाडीचे सरपंच संतोष टिकेकर यांनी सांगितलं. तो घरोघरी जातो,शिल्लक अन्न गोळा करतो; पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही सॅल्युट कराल ‘आमच्या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. या वर्गात 39 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत 5 किलो वॅट सौर उर्जा निर्मितीचा प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे गावातील वीज कधीही जात नाही. तसंच शाळेला वीज बिल येत नाही. त्यामुळे शाळेतील टॅब, संगणक कक्षातील संगणक, प्रिंटर आणि अन्य मशिन, वर्गातील लाईट, फॅन्स, प्रोजेक्टर या सर्व साधनांना लागणारी वीज ही सौर उर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होते, असं गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक संतोष गडगे यांनी सांगितलं. टिकरेवाडीमध्ये सुरू असलेल्या या प्रयोगाची दखल केंद्र सरकारनंही घेतलीय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या गावाचा सन्मान करण्यात आलाय. टिकरेवाडी पॅटर्नचं अनुकरण अन्य गावांनीही केला तर त्यांचेही अनेक प्रश्न सुटू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात