जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Pune News: ज्या मुलाला पुस्तकं घेऊन दिली, त्याच्यासोबतच दिली दहावीची परीक्षा, आई झाली 51 टक्के घेऊन पास, Video

Pune News: ज्या मुलाला पुस्तकं घेऊन दिली, त्याच्यासोबतच दिली दहावीची परीक्षा, आई झाली 51 टक्के घेऊन पास, Video

Pune News: ज्या मुलाला पुस्तकं घेऊन दिली, त्याच्यासोबतच दिली दहावीची परीक्षा,आई झाली 51 टक्के घेऊन पास, Video

Pune News: ज्या मुलाला पुस्तकं घेऊन दिली, त्याच्यासोबतच दिली दहावीची परीक्षा,आई झाली 51 टक्के घेऊन पास, Video

शिक्षणाला वयाचं कोणतंच बंधन नसतं हेच पुण्यातील कचरा वेचक असणाऱ्या मोनिका तेलंगे यांनी दाखवून दिलंय. वयाच्या 43 व्या वर्षी मुलासोबत दहावीची परीक्षा देत त्यांनी यश मिळवलंय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 5 जून: नुकताच राज्यातील 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. तर काही ज्येष्ठांनीही शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर वय अडथळा ठरत नाही, हेच आपल्या यशातून दाखवून दिले आहे. पुण्यातील मोनिका तेलंगे यांनी वयाच्या 43 व्या वर्षी मुलासोबत दहावीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झाल्या आहेत. मोनिका या कचरा वेचक असून अनेक संकटांवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. मुलगा आणि आई दोघेही दहावी पास लॉकडाउनमध्ये मुलाचं घरी ऑनलाइन शिक्षण सुरू होतं. तेव्हा नकळत आईचाही अभ्यासातला रस वाढला. मुलाबरोबर आईनंही गृहपाठाला सुरुवात केली. अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायची हिच संधी असल्याची जाणीव झाल्याने जिद्दीने आईनेही मुलाबरोबर दहावीची परीक्षा दिली. हलाकिच्या परिस्थितीत कष्टाने मुलाचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या मोनिका तेलंगे आणि मुलगा मंथन दोघेही दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मोनिका यांनी परीक्षेत 51.8 आणि मंथन याने 64 टक्के गुण मिळवले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

मोनिका आहेत कचरा वेचक कर्मचारी मोनिका तेलंगे या मूळच्या मुंबईच्या असून मुलगा मंथनसह त्या हडपसर परिसरात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून त्या स्वच्छ संस्थेमार्फत कचरावेचक कर्मचारी म्हणून काम करत आहेत. नववीत शिकत असताना मोनिका यांचे लग्न झाले आणि त्या पुण्यात आल्या. संसार आणि मुलांमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणं शक्य झालं नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच आठ वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाले. एक मुलगा, मुलगी आणि घरची जबाबदारी अचानक अंगावर आली. परिस्थितीमुळे मुलांचं शिक्षण थांबावयचं नाही, हा ध्यास घेऊन त्यांनी घरची कामे सांभाळून कचरावेचक म्हणून कामाला सुरुवात केली. मुलांच्या अभ्यासातही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. 3 मुलींच्या शिक्षणासाठी चौथी पास आईनं दाखवलं धाडस, रोजचा संघर्ष पाहून तुम्हीही कराल सलाम, Video मुलाचा अभ्यास घेताना लागली अभ्यासाची गोडी लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद असल्याने मंथन घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होता. घरात काम करताना शिक्षक शिकवत असलेले धडे माझ्या कानावर पडत होते. शाळा संपल्यावर मी त्याचा अभ्यास घेत असे. याच काळात माझाही अभ्यासातला रस वाढला. लहानपणापासून मला शिकायचे होते, पण परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. मुलगा दहावीत गेला त्याच वेळी मी देखील परीक्षेचा फॉर्म भरायचं ठरवलं. आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. मला अवघड वाटणाऱ्या गोष्टी मंथनने मला शिकवल्या. त्याला येत नसलेले मी शिकवले. दोघांनी मिळून गृहपाठ केला. आज परीक्षेचा निकाल हातात मिळाल्यावर शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद झाला, अशी भावना मोनिका तेलंगे यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात