जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात TCSच्या कर्मचाऱ्याची ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात TCSच्या कर्मचाऱ्याची ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात TCSच्या कर्मचाऱ्याची ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

सकाळी 7 च्या सुमारास ते ऑफिस मध्ये आल्या नंतर पाणी आणतो म्हणून ते बाहेर पडले आणि पुन्हा दिसलेच नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड 03 डिसेंबर : महाराष्ट्राचं आयटी हब असलेलं पुणं एका आत्महत्येच्या घटनेनं हादरून गेलंय. हिंजवडी आयटी पार्क मधील विख्यात TCS कंपनीत एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकिस आलीय. कपिल विटकर असं या घटनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आलीय. पोलीस घटनेचा तपास करत असून सर्व अंगाने तपास करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ही घटना आज सकाळी घडल्याचं माहिती पोलिसांनी, पोलिसांनी दिलेल्या माहिती निसर कपिल विटकर हे टीसीएस कंपनीमध्ये फ्रंट ऑफिसमध्ये काम करत होते. सकाळी 7 च्या सुमारास ते ऑफिस मध्ये आल्या नंतर पाणी आणतो म्हणून ते बाहेर पडले आणि पुन्हा दिसलेच नाहीत त्यांनी थेट सहाव्या मजल्यावर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ‘हिंदू संतांची मदत केली नसल्यानेच फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद गेले’ त्यासाठी विटकर यांनी विमानात बॅगेचे लॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक टॅग एकत्र करुन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांचा मागील महिन्यात घरामध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्या पाठीत दुखणे सुरु झाले. मागील काही दिवासांपूर्वी ते सुट्टीवर होते. PM मोदी आणि अमित शहा दोन दिवस पुणे मुक्कामी, ठाकरे CM झाल्यानंतरचा पहिलाच दौरा त्याचे ऑफिस कंपनीच्या तीसऱ्या मजल्यावर असून त्यांना सहाव्या मजल्यावर जाऊन कशी आत्महत्या केली त्यांना कुणीच कसं बघितलं नाही यावर संशय व्यक्त केला जातोय.  दरम्यान आत्महत्या प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली असून या घटनेची कसून चोकशी करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी ह्यांनी दिलीय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात