Home /News /pune /

Pune: मोठी दुर्घटना टळली, सिंहगडावर जाणारी बस दरीत कोसळली असती, थरारक VIDEO आला समोर

Pune: मोठी दुर्घटना टळली, सिंहगडावर जाणारी बस दरीत कोसळली असती, थरारक VIDEO आला समोर

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, सिंहगडावर जाणाऱ्या ई-बसचा अपघात होता होता वाचला, थरारक VIDEO

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, सिंहगडावर जाणाऱ्या ई-बसचा अपघात होता होता वाचला, थरारक VIDEO

Pune News: सिंहगडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रवासी, पर्यटकांना ई-बस ने प्रवास करावा लागत आहे.

पुणे, 14 मे : पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड किल्ल्यावर (Sinhgad fort) जाणाऱ्या पुणे परिवहन मंडळाच्या ई-बसला अपघात होता होता वाचला आहे. सिंहगड किल्ल्यावरुन ई-बस (e Bus) खाली उतरत असताना वळणावर बस घसरली. शुक्रवारी  दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या वेळी बस थेट सुरक्षा कठड्याला धडकली. सुदैवाने सुरक्षा कठडा मजबूत होता आणि बसचा वेगही अधिक नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. पीएमपीच्या सेवेत तत्काळ सुधारणा करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. आठवड्याभरातील तिसरी घटना पुणे सिंहगडावर अपघात होता होता वाचला आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. सिंहगडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या प्रवाशांना ई-बस ने गडावर जावं लागतं. मात्र बसेस या घाटात अडकून पडत असल्याने गेल्या आठ दिवसात तीन वेळा अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वाचा : आधी दोन चिमुकल्यांना विष पाजलं आणि मग आईने.... ; सोलापुरातील धक्कादायक घटना पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ 1 मे रोजी करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळाजी गरज आहे आणि त्यासाठीच या ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पीएमपीएमएलच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, या सेवेतील बसला आठवड्याभरात तिसऱ्यांदा अपघात झाल्याने चिंता वअयक्त करण्यात येत आहे. माझा सिंहगड, माझा अभियान या मोहिमे अंतर्गत 1 मे पासून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत अशी ई-बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या सुट्ट्यांचा कालावधी असल्याने पर्यटकांची वाढती संघ्या लक्षात घेता वीकेंडला 24 बसेस चालवल्या जात आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra News, Pune

पुढील बातम्या