रायचंद शिंदे, पुणे पुणे, 4 जून : पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा हे गाणं तुमच्या कानावर नक्कीच कधीतरी पडलं असेल. मात्र, यावेळी घाटात बैलगाड्याने नाही तर पावसाने राडा घातला आणि गाडाशौकीनांच्या आनंदावर विरजण घातले. पुणे जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसाचा बैलगाडा मालकांनाही मोठा फटका बसला. वादळी पावसानं काही मिनिटातच बैलगाडा घाट ओस पडला. शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने थैमान घातल्याने बैलगाडा शर्यतीचे प्रचंड नुकसान झाले. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज दुपारनंतर अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने बैलगाडा घाटात लावलेल्या मंडप आणि साऊंड सिस्टमचे प्रचंड नुकसान झाले असून बैलगाडा मालकांनाही या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसाने चांगलंच झोडपलं आहे.
शिरूर : जोरदार पावसाने बैलगाडा शौकीनांच्या आनंदावर विरजण#pune #bullockcartrace pic.twitter.com/IDUk4vIasE
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2023
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस आज दुपारी उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यात जोरदार वारे व मुसळधार पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. वाचा - Koyta Gang Terror In Pune : पाचसहा जण आले अन्..; पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, पाहा PHOTO सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले. यावेळी जल्लीकट्टू हा तमिळनाडू राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे विधिमंडळाने घोषित केले आहे, तेव्हा न्यायपालिका यापेक्षा वेगळा विचार करु शकत नाही. कायदेमंडळ हे ठरवण्यासाठी सर्वात योग्य आहे, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. दरम्यान, यात्रा-जत्रा आणि बैलगाडा शर्यतींचा हंगाम संपला आहे. लग्नसराई सुरू झाली आहे. तरी विविध कारणे काढत बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या नव्या आदेशाकडे सर्वांनीच डोळेझाक केलेली दिसतेय.