पुण्यातील कोयता गँगची दहशत अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील कोयता गँगचे लोण हळूहळू पसरत चालले आहे. नुकतेच शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजविली.
टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि ओरसे (वय 42, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली.
ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
यानंतर काही दिवस कोयता गँग शात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा अशा घटना घडू लागल्या आहेत.