जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : घरातील जुन्या कपड्यांची चिंता नको, ‘इथं’ मिळेल नवं रुप, पाहा Video

Pune News : घरातील जुन्या कपड्यांची चिंता नको, ‘इथं’ मिळेल नवं रुप, पाहा Video

Pune News : घरातील जुन्या कपड्यांची चिंता नको, ‘इथं’ मिळेल नवं रुप, पाहा Video

घरातील जुने कपडे अनेक जण फेकून देतात. त्याच कपड्यांना नवं रूप देण्याचं काम पुण्यातील ‘या’ ठिकाणी होतं.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे 2 जून : चटई, पायपुसनी, रजई, बेडशीट या गोष्टींची गरज प्रत्येक घरात असते. बदलत्या काळापासून यामध्ये वेगवेगळे प्रकार आले आहेत. त्याचबरोबर त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे या गोष्टी कमी किंमतीमध्ये कुठं मिळतील याचा शोध प्रत्येक जण करत असतात. पुण्यातील एक व्यवसायिक घरातील जुन्या कपड्यांपासून या वस्तू माफक दरात तयार करून देण्याचं काम करत आहेत. काय आहे वैशिष्ट्य? पुण्यातील कोथरुड-शास्त्रीनगर परिसरात कादरी हँडलूममध्ये या वस्तू तयार करून मिळतात. सलीम अन्सारी हे या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. 2014 पासून ते पुण्यात हा व्यवसाय करतात. सलीम यांनी लहानपणीच या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं होतं. आपणही हा व्यवसाय स्वतंत्रपणे करू शकतो, असा त्यांना विश्वास होता. त्यानंतर त्यांनी जुन्या कपड्यापासून नवीन कपडे बनवण्यास सुरूवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

येथील दरही माफक आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. दोनशे रुपयांपामध्ये तीन मोठ्या पायपुसण्या इथं मिळतात. लहान चार पायपुसण्यांची किंमत 130 रुपये आहे. मोठ्या रजईची किंमतही सर्वांना परवडणारी असल्याचं कादरी यांनी सांगितलं. पॅरालिसिस आणि ब्रेन अटॅक; तरी विशाल खचला नाही, 44 वर्षी झाला बारावी पास! घरातील जुन्या वस्तू फेकून न देता त्या आम्हाला दिल्या तर आम्ही त्यापासून नव्या वस्तू तयार करून देतो. त्याची किंमतही कमी आहे. तसंच काही जण कपडे जुने झाले म्हणून टाकून देतात. त्या कपड्यांनाही नवीन करकरीत करण्याचं काम आम्ही करतो, असं अन्सारी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात