पुणे, 26 जुलै : पुणे शहर आणि जिल्ह्यातील पावसाचा जोर आता वाढलाय. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झालाय. त्यामुळे पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. पुण्यातील खडकवासला धरण आता 91 टक्के भरलंय. या धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झालीय. खडकवासला धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मंगळवारी संध्याकाळपासून या धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असलं तरी पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली असं म्हणता येणार नाही.
खडकवासला धरण साखळीतील मोठी धरणं जेमतेम 60 ते 65 टक्के इतकीच भरली आहेत.त्यामुळे पाणी सोडलं जातं असल्याचं दृश्य सुखावणारं असलं तरी धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात वाहनं, जनावरं असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांनी सतर्क राहावं, असं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, कोल्हापूरला महापूराचा धोका? Video कोल्हापूरला धोका कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. आज (26 जुलै) धरणारे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. राधानगरी धरण मंगळवारी 95 टक्के भरलं होतं. त्यानंतर नदीकाठच्या गावातील नागरिंकाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबतीत जिल्हा प्रशासनाने आधीच 2019 आणि 2021 च्या पुरामध्ये बाधित ठरलेल्यांना स्थलांतरीत होण्यासाठी समान बांधून तयार राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.