जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे जिल्ह्यात पाण्यात वाहून जाणारा कर्मचारी थोडक्यात वाचला, थरारक VIDEO आला समोर

पुणे जिल्ह्यात पाण्यात वाहून जाणारा कर्मचारी थोडक्यात वाचला, थरारक VIDEO आला समोर

पुणे जिल्ह्यात पाण्यात वाहून जाणारा कर्मचारी थोडक्यात वाचला, थरारक VIDEO आला समोर

खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसाकल घसरली आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहात गेले. जेसीबीच्या साहाय्याने कर्मचाऱ्याला वाचवतानाचा थरारक VIDEO समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदापूर, 14 ऑक्टोबर : राज्याच्या विविध जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच इंदापूर नगर परिषदेचा कर्मचारी अंबादास नाळे हा पावसाच्या पाण्यात वाहून जाण्यापासून थोडक्यात वाचला आहे. जेसीबीच्या साहाय्याने कर्मचाऱ्याला वाचवतानाचा थरारक VIDEO समोर आला आहे. इंदापूरच्या श्रीराम चौकातून आलेल्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी इंदापूर नगरपालिकेचा कर्मचारी अंबादास नाळे हा चालला होता. त्यावेळी खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसाकल घसरली आणि तो पाण्यात पडला. पण सुदैवाने जवळच एका मुरमाच्या ढिगाजवळ पाण्यात अडकला. तेवढ्यात काही मिनिटात पाण्याला वाट करुन देण्यासाठी जेसीबी तेथे आला. त्यानंतर अथक परिश्रमाने पाण्यात अडकलेल्या नगर पालिकेचा कर्मचाऱ्याला जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. नशिब बलवत्तर म्हणूनच तो वाचला, असेच उद्गार घटनास्थळी उपस्थित लोकांनी काढले.

जाहिरात

दरम्यान, पुणे-सोलापूर हायवे पावसामुळे बंद केला असून उजनी धरणाचे पाणी भिगवण,डाळज,पळसदेव,इंदापुर येथे हायवेवर आले असल्याने पुण्यातून सोलापूरकडे जाणारी वाहतूक लोणी काळभोर येथे थांबविली आहे. त्यामुळे कोणीही सोलापूरचा दिशेने प्रवास करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्यात संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळला. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पावसाचा जोर उद्या आणखी वाढू शकतो. सततच्या पावसामुळे घराकडे निघालेल्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्राकडे निघालेलं तुफान आता पुणे जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आहे. संध्याकाळपासून जिल्ह्यातल्या अनेक भागांना धुवांधार पावसाने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची दैना उडवली. अनेक भागातली वीज गायब झाली आहे. सोलापूरलगच्या तालुक्यांना जबर फटका बसला. इंदापूर तालुक्यातल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात