जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल रजा, 20 वर्षांपासून करताय वारकऱ्यांची सेवा, Video

वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल रजा, 20 वर्षांपासून करताय वारकऱ्यांची सेवा, Video

वारकऱ्यांची सेवा करणारे अब्दुल रजा, 20 वर्षांपासून करताय वारकऱ्यांची सेवा, Video

अब्दुल रजा हे गेल्या 20 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. वारकऱ्यांची सेवा करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम ते करतात.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे, 13 जून: जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जणं करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतो. मात्र, मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या 20 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. 20 वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा अब्दुल रजा हे मूळ हैदराबादला राहायला गेलेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात आणि अनेक वारकरी त्यांची सेवा घेण्यासाठी न चुकता येत असतात. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात. मनात कुठलाही समतोल न ठेवता सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले 20 वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करत आहेत.

Ashadhi Wari 2023: माऊलींच्या पालखीत 2000 आयटी वारकरी, दरवर्षी येतात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल सहभागी, Video

 ह्या सेवेतून आनंद मिळतो वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो आणि माझा मालिश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचे ब्रॅण्डिंग हे होत असते. म्हणून ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. जडी बुटी आयुर्वेदिक वनस्पती पासून मी स्वतः हे तेल करतो आहे. मसाज मधून आराम मिळतो दुखायचं राहत. त्यामुळे वारकरी आशीर्वाद देतात आणि ह्या सेवेतूनच मला आनंद मिळतो, असं अब्दुल रजा यांनी सांगितले. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात