Home /News /pune /

‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस

‘त्या’ भन्नाट ट्विटनंतर पुणे पोलिसांचा आणखी एक षटकार, मनोज वाजपेयीसह नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस

पुण्याच्या सायबर पोलिसांनी केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच गाजत आहे. त्यावर नेटिझन्सनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

    पुणे, 5 जुलै : सायबर गुन्हे (Cyber Crime) रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या पुणे पोलिसांचं (Pune Police) एक ट्विटर हँडल (Twitter Handle) सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. अत्यंत नावीन्यपूर्ण, खुमासदार आणि मिश्किल कल्पना लढवत या ट्विटर हँडलवरून सायबर गुन्हेगारीविरोधात नागरिकांना सावध करण्याचं केलं जातं. सध्या सगळीकड़े गाजणाऱ्या ‘फॅमिली मॅन’ या (Family Man) बेवसीरिजचा आधार घेत पुणे पोलिसांनी केलेलं एक ट्विटर पाहून स्वतः मनोज वाजपेयीदेखील (Manoj Bajpayee) आश्चर्यचकित झाला. CP Pune City या ट्विटर अकाऊंटवरून अभिनेता मनोज वाजपेयींना टॅग करून एक ट्विट करण्यात आलं आहे. तुम्ही आता फॅमिली मॅन झाला असाल हो, पण म्हणून आम्ही काही सरदार खानला विसरलेलो नाही. सायबर क्राईमविरोधातली लढाई सुरू ठेवण्यासाठी आम्हाला अजूनही सरदार खानवरच अवलंबून राहावं लागतं, असं ट्विट करून पुणे पोलिसांनी एकच धमाल उडवून दिली आहे. या ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडत असून स्वतः मनोज वाजपेयीनंदेखील या कल्पनाशक्तीचं कौतुक केलं आहे. हे वाचा -भारीच ना राव! पुणे पोलिसांचं ते ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल पुणे पोलीस आणि गँग्ज ऑफ वासेपूर सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचा बचाव करा, असा संदेश देणारं मूळ ट्विट पुणे पोलिसांनी सोमवारी सकाळी केलं. त्यामध्ये ‘जर बनायचं असेल ऑनलाईन सौद्यांचा सरदार, तर OLX/Quikr विक्रेत्यांची कागदपत्रं पडताळून करा व्यवहार’ असा संदेश देण्यात आला होता. त्यावर नेटिझन्सनी पसंतीची मोहोर उमटवली. या ट्विटचं अभिनेता मनोज वाजपेयीनंदेखील कौतुक केलं. त्यावर पुणे पोलिसांनी आणखी एक ट्विट करत षटकार खेचला.  आता तुम्ही ‘फॅमिली मॅन’ झाला असला, तरी आम्हाला मात्र सरदार खानवरच अवलंबून राहावं लागत असल्याचं ट्विट पुणे पोलिसांनी केलं.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Cyber crime, Manoj Bajpayee, Pune poilce

    पुढील बातम्या