जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये... पुण्यासह राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तासात 4 मोठ्या कारवाया

पुणे पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये... पुण्यासह राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तासात 4 मोठ्या कारवाया

पुणे पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये... पुण्यासह राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तासात 4 मोठ्या कारवाया

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar-e-taiba) काम करणाऱ्या तरूणाला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. तर पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यातही पुणे पोलिसांना यश आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 13 जून : पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. कारण मागील 24 तासात पुणे पोलीसांनी चार कारवायांमध्ये चार आरोपींना अटक केली आहे. पुण्याच्या आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने या कारवाया मोठ्या मानल्या जात आहेत. यामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबासाठी (Lashkar-e-taiba) काम करणाऱ्या तरूणाला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. तर पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यातही पुणे पोलिसांना यश आलं आहे.  24 तासात घडलेल्या या चार घडामोडींची सविस्तर माहिती घेऊयात. 1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी तब्बल 1105 काडतुसे जप्त पुणे पोलिसांनी एका भंगाराच्या दुकानातून (Scrap shop) तब्बल 1105 काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहू दौऱ्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवलं होतं. या ऑपरेशन दरम्यान गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. या धाडीत पुणे पोलिसांना जिवंत काडतुसे तसेच काडतुसाचे लीड सापडले. या प्रकरणी भंगारमालक व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत.

News18

2. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तरूणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं (Pune ATS) उत्तर प्रदेशात अटक केली आहे. इमानूल हक (Inamul Haq) असं या तरूणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरूणाला एटीएसनं यापूर्वी अटक केली होती. इमानूल त्याच्या संपर्कात होता. त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्यासाठी जुनैदला पैसे मिळत होते. जम्मू काश्मीरमधून पैसे मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याने 10 हजार रुपये घेतले होते. दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनैद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर आठवडाभर चौकशी केल्यानंतर 10 हजार रुपये घेतल्याचं मोहम्मद जुनैद याने मान्य केलं. जुनैद आणि इमानूल हे दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. जुनैदच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार पुणे एटीएसनं इमानूलला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. 3. पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट पुण्यातील भवानी पेठ (bhavani peth pune) परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट ( blast in a flat in Pune ) झाला. विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला होता. या प्रकरणी रशाद मोहम्मद अली शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे (Pune) पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पुणे पोलीस अजूनही काही प्रतिक्रिया तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे. दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

News18

4. सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला अटक पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात आरोपी सौरभ महाकाळनंतर दुसरा आरोपी संतोष जाधव (Police arrested Santosh Jadhav) याला अटक केली आहे. संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान लॉरेन्स बिष्णोई टोळीचे हस्तक महाराष्ट्रतही पसरलेले आहेत, अशी माहिती सौरभ महाकाळ याच्या चौकशीत समोर आली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं समजतंय. त्यामुळे आता या 11 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात