मराठी बातम्या /बातम्या /पुणे /FASTag चा विचित्र अनुभव, कवी संदीप खरे संतापले; टोलनाक्यावर नेमकं काय झालं हे सांगणारा VIDEO केला शेअर

FASTag चा विचित्र अनुभव, कवी संदीप खरे संतापले; टोलनाक्यावर नेमकं काय झालं हे सांगणारा VIDEO केला शेअर

लोकप्रिय युवा कवी संदीप खरे यांना कोल्हापूर-पुणे प्रवासात याबाबतचा अनुभव आला.

लोकप्रिय युवा कवी संदीप खरे यांना कोल्हापूर-पुणे प्रवासात याबाबतचा अनुभव आला.

लोकप्रिय युवा कवी संदीप खरे यांना कोल्हापूर-पुणे प्रवासात याबाबतचा अनुभव आला.

पुणे, 19 फेब्रुवारी : सर्व टोल नाक्यांवर FASTag सक्ती लागू करण्यात आली आहे. मात्र त्यात असलेल्या त्रुटींचा फटका सर्ववसामान्य असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती या सर्वांना बसत आहे. गुरुवारी लोकप्रिय युवा कवी संदीप खरे यांना कोल्हापूर-पुणे प्रवासात याबाबतचा अनुभव आला.

FASTag स्टिकर स्कॅन होत नाही सांगत दुप्पट शुल्क वसुलीचा प्रयत्न टोल कर्मचाऱ्यांनी केला. मात्र संदीप खरे हे ठाम राहिले आणि FASTag सुरू आहे दंड भरणार नाही, असं म्हणाले. अखेर वेगळ्या मशिनने स्टिकर स्कॅन झाले आणि पैसे जमा झाले. मात्र वेळ वाया गेला, तसंच मनस्तापही झाल्याने याबाबत संदीप खरे यांनी एक व्हिडिओ करत प्रशासनाला यातील त्रुटी दूर करण्याचं आवाहन केलं आहे.

संदीप खरे यांनी फेसबुकवर शेअर केला अनुभव

गाडीचे स्टिकर स्कॅन होत नाही मग 75 ऐवजी 150 रुपये भरा, असा धोशा टोल कर्मचाऱ्यांनी संदीप खरे यांच्याकडे लावला. मात्र आपल्या खात्यात रक्कम जमा आहे. दंड का भरू? असा सवाल खरे यांनी केला. त्यांनी नुकताच टोल भरला होता, त्याचा पुरावा म्हणून मेसेजही दाखवला. कर्मचारी मात्र उद्धट भाषा वापरत वाद घालतच होते. दरम्यान वरिष्ठ अधिकारी आले आणि दुसरं मशीन आणण्यात आलं. त्यानंतर स्टिकर स्कॅन झालं आणि वादावर पडदा पडला, असं खरे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओतून सांगतिलं आहे.

काय आहे FASTag संदर्भातील निर्णय?

काही दिवसांपूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय महामार्गांवरील फी प्लाझामधील सर्व लेन “फी प्लाझाची फास्टॅग लेन” म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे एनएच शुल्क अधिनियम 2008 नुसार FASTag लेनमध्ये प्रवेश करणारे FASTag न बसवलेले कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत FASTag शिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.

यासंदर्भातील मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात FASTag बसवणे अनिवार्य केले होते.

प्रवर्ग ‘एम’ म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन आणि ‘एन’ मालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.

First published:

Tags: Fastag