जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : जमिनीखाली खोदून बांधण्यात आली ही लेणी; पुणेकरांनो, तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण?

Pune News : जमिनीखाली खोदून बांधण्यात आली ही लेणी; पुणेकरांनो, तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण?

Pune News : जमिनीखाली खोदून बांधण्यात आली ही लेणी; पुणेकरांनो, तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण?

जमिनीखालील असलेली पाताळेश्वर लेणी तुम्ही पाहिलीत का? या लेणीचा इतिहास काय पाहा.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 जुलै : पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा आहे तसाच ऐतिहासिक वारसाही आहे.  पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वाडे, वास्तुकला, किल्ले आहेत. त्यापैकीच शिवाजीनगर परिसरात पाताळेश्वर ही जमिनी खालील लेणी पाहिला मिळते. या लेणीला पाहिला या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. या लेणीचा काय आहे इतिहास? ही लेणी कोणी बांधली याबद्दलच इतिहास संशोधक संजय सोनवणे यांनी माहिती दिली आहे. काय आहे इतिहास? राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष याने त्याच्या काळात इ.स.च्या 8 व्या शतकाच्या सुमारास पाताळेश्वर लेणी खोदून बांधली. राष्ट्र कुटांच्या काळात पुणे हे पुनवडी म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात. पाताळेश्वर हे लेणी जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पाताळेश्वर लेणीला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड आणि वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे. त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे, असं इतिहास संशोधक संजय सोनवणे सांगतात. कोरलेलं शिवमंदिर आहे पातळेश्वर गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे. तेव्हा लेणी कशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.

Pune News : पुणे तिथे..; आयफेल टॅावर चक्क पुण्यात? जगातील 7 आश्चर्ये एकाच ठिकाणी

पातळेश्वर हे एक काताळात कोरलेलं शिवमंदिर आहे. पूर्वी हा व्यापारी मार्ग असल्यामुळे राष्ट्रकूट राज्याच्या काळात ही लेणी बांधण्यात आली. जमिनीच्या काताळात कोरलेली ही एक सुंदर लेणी आहे. याच आपण जतन करून ठेवलं पाहिजे, असं इतिहास संशोधक संजय सोनवणे सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune , travel
  • First Published :
जाहिरात
जाहिरात