जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / VIDEO पुण्यातला धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यात; भर दिवसा बसमध्ये चढून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न

VIDEO पुण्यातला धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यात; भर दिवसा बसमध्ये चढून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न

VIDEO पुण्यातला धक्कादायक प्रकार CCTV कॅमेऱ्यात; भर दिवसा बसमध्ये चढून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न

पुण्यात दिवसा ढवळ्या बस कंडक्टरला लुटण्याचा असा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. शनिपार ते नीलज्योती या मार्गावरच्या बसमध्ये हा प्रकार झाला. पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 18 फेब्रुवारी : भर रस्त्यात भर दिवसा PMPML बसमध्ये घुसून कंडक्टरला (वाहकाला) मारहाण करण्याचा प्रकार CCTV कॅमेऱ्यामुळे उजेडात आला आहे. पुण्यात दिवसा ढवळ्या बस कंडक्टरला लुटण्याचा असा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखून गुंडांच्या हाती कॅश लागू दिली नाही. त्यांनी आरडाओरडा केल्याने दोन हल्लेखोर पळून गेले. शनिपार ते नीलज्योती दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक 59 या पीएमपीच्या बसमध्ये हा प्रकार घडला. शनिपाराहून आलेली बस नीलज्योती थांब्यावर उभी होती. बसमध्ये ड्रायव्हर कंडक्टरशिवाय कोणी नव्हतं. त्याच वेळी अचानक दोन तरुण बसमध्ये घुसले. त्यांनी कंडक्टरच्या हातातली पैशाची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. पण कंडक्टरने प्रसंगावधान राखून गुंडांना थोपवलं. त्यावर या दोन गुंड युवकांनी वाहकाला मारहाण करायला सुरुवात केली. वाहक कैलास रणदिवे यांनी जोरदार प्रतिकार केला. हे वाचा -  चिनी व्हायरसला रोखणार पुणेरी लस; 6 महिन्यांत प्रतिबंधात्मक लसीचं ह्युमन ट्रायल हातातली कॅश असलेली बॅग गुंडांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी जोरदार प्रयत्न केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

जाहिरात

हा CCTV VIDEO समोर आल्यानंतर वाहक कैलास रणदिवे आणि बसचालक महादेव शिंदे यांचं कौतुक होत आहे. गुंड कंडक्टरला मारहाण करत असल्याचं लक्षात येताच चालक शिंदे यांनी आरडाओरडा केला. वाहत्या रस्त्यावर अचानक ही घटना घडली. या अनपेक्षित घटनेनं क्षणभर चालकही भांबावून गेले होते. पण त्यांच्या आरडा ओरड्यामुळे आणि जोरदार प्रतिकारामुळे हल्लेखोर तरुण पळून गेले. हे वाचा - ‘हेमंत करकरे यांची हत्या कसाबच्या गोळ्यांनी नव्हे, पोलिसांच्या पिस्तूलने झाली’ या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. CCTV मध्ये हल्लेखोर कोण ते स्पष्ट दिसत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात