कोरोना आणि किडनीच्या आजारानं प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

कोरोना आणि किडनीच्या आजारानं प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

42 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान वाजिद खान यांचं निधन.

  • Share this:

मुंबई, 01 जून : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं किडनी आणि कोरोनाच्या आजारानं निधन झालं आहे. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत होती. त्यांच्या अकाली निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

किडनीच्या आजारामुळे वाजिद यांना 60 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही काळापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंडाचं प्रत्यारोपणही झालं होतं. तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोनाची लक्षण दिसल्यानं चाचणी करण्यात आली. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मधुमेहाचा त्रासही होता.

वाजिद यांच्या अखेरच्या क्षणी केवळ दोन लोकांनी भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. तर लॉकडाऊनमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेसाठी 20 ते 30 जणांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाजिद खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोकाकूल वातावरण आहे. 42 व्या वर्षी त्यांच्या अशा जाण्यानं बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने संगीत दिलं आहे.

बॉलिवूडमच्या अनेक कलाकारांनी वाजिद खान यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. 'प्रसिद्ध सारेगमप 2012, 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' या शोसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. वाजिद-साजिद खा जोडगोळीनं वॉन्टेड', 'मुझसे शादी करोगी', 'एक था टायगर', 'दबंग' या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 1, 2020, 6:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading