जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : बॉक्सिंगसाठी बदलली शाळा, पुणेकर प्रतीक्षानं बारावीतही लगावला जोरदार ‘पंच’, Video

Pune News : बॉक्सिंगसाठी बदलली शाळा, पुणेकर प्रतीक्षानं बारावीतही लगावला जोरदार ‘पंच’, Video

पुणेकर बॉक्सर प्रतीक्षानं शिक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला होता.

पुणेकर बॉक्सर प्रतीक्षानं शिक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला होता.

पुणेकर प्रतीक्षानं बॉक्सिंगमधील ध्येय साध्य करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला होता.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 30 मे : बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या परिक्षेत आपल्या मुलाला किती मार्क्स पडतात याकडं आई-वडिलांचं विशेष लक्ष लागलेलं असतं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत पुण्यातील रात्रशाळेत शिकलेल्या प्रतीक्षा सोळुंखेनं यश मिळवलंय. … म्हणून रात्रशाळेत प्रवेश दिवसा काम करत असल्यानं वेळ मिळत नाही म्हणून रात्रशाळेत विद्यार्थी प्रवेश घेतात. पण, प्रतीक्षाचं रात्रशाळेत शिकण्याचं कारण वेगळं आहे. प्रतिक्षा ही बॉक्सिंग खेळाडू आहे. ती नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळलीय. याच खेळात पुढं करिअर करण्याचं तिचं ध्येय आहे. बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेता यावं, नियमित प्रॅक्टीस करता यावी म्हणून प्रतिक्षानं रात्रशाळेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. रात्रशाळेत अभ्यास करून तिनं बारावीला 65 टक्के मार्क्स मिळवले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

प्रतीक्षाला चौथीपासूनच बॉक्सिंगची आवड निर्माण झाली. तिनं सहावीपासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. आत्तापर्यंत तिनं 25 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ‘भारताची ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोम ही माझी आदर्श आहे. मलाही तिच्यासारखंच वर्ल्ड चॅम्पियन होण्याची इच्छा आहे.’ असं प्रतिक्षानं यावेळी सांगितलं. पुढील काळात बॉक्सिंगवर फोकस करण्याबरोबरच सीए होण्याचं तिचं ध्येय आहे. इस्त्रीवाल्याच्या मुलीनं जिद्दीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video मेरी कोमला आदर्श मानून प्रतीक्षाचा सराव सुरू आहे, नॅशनल स्पर्धा खेळण्याचं तिचं स्वप्नही नुकतंच पूर्ण केलंय. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षेतही यश मिळवत तिनं यशाचा दुहेरी पंच यावर्षी लगावलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात