Home /News /pune /

पुणे पोलिसांनी दारू विक्रीसाठी घेतला मोठा निर्णय, उद्यापासून नियम लागू

पुणे पोलिसांनी दारू विक्रीसाठी घेतला मोठा निर्णय, उद्यापासून नियम लागू

दारू खरेदी करणाऱ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली. पण यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी दारू विक्रीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पुणे, 04 मे : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला. या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथिल करत दारू विक्रीसाठी परवाणगी देण्यात आली. पुण्यात दारू खरेदीसाठी लोकांची तोबा गर्दी पहायला मिळाली. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. दारू खरेदी करणाऱ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली. पण यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी दारू विक्रीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पुण्यात दारू विक्रेता आणि खरेदी करणाऱ्या लोकांसाठी पोलिसांनी काही नियम आखले आहेत. याच नियमांनुसार पुण्यात दारू विक्री होईल असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आज दुपारी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दारू विक्रीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर सगळीकडे एकच गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे तात्काळ दारूची दुकानं बंद करण्यात आली होती. पण उद्यापासून पुणेकरांना टोकन घेऊन दारू विकत घ्यावी लागणार आहे. यासाठी पुणे पोलिसांनी कोणते नियम आखले आहेत पाहुया... नागरिकांना रस्त्यावर पाहून मुख्यमंत्री भडकले; 30 मेपर्यंत दिला हा अल्टिमेटम - सामाजिक अंतर पाळले जातील याची खबरदारी मद्यविक्रीच्या दुकानांनी घेतली पाहिजे. आणि रेड झोनमध्ये हे त्यांचं कर्तव्यच आहे. - कोणत्याही दुकानामुळे गर्दी होऊ लागली तर त्याबद्दल कारवाई केली जाईल. - वेळा घालून टोकन देण्याची पद्धत अवलंबावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांना दुकानाबाहेर थांबवावं. सॅनिटायझर्सची व्यवस्था करावी. दारूला मिळाली आता यासाठी परवानगी हवी : धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र - तसेच, पूर्वीप्रमाणेच वैध परवाना असल्याखेरीज वाहनाला परवानगी नाही. यामध्ये खरेदीच्या कारणांचाही समावेश आहे. घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी. वैध परवान्याशिवाय वाहन रस्त्यावर आल्यास जप्ती व किमान 2500 रुपयांच्या हमीपत्राची कारवाई होऊ शकते. कंपन्या (ज्यांचे कारखाने पुणे मनपा हद्दीबाहेर आहेत) व कन्स्ट्रक्शन (प्रत्यक्ष जागेवर) यांना वैयक्तिक वाहनापेक्षा 'समर्पित बस गाड्यां'च्या वाहतुकीला परवानगी आहे. Punepolice.in इथे या सुविधा उपलब्ध असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या