पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकामधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे.
या भुयारी मार्गाच्या कामासाठी ३ ट्नेल बोरींग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत ७ किमीचा भुयारी मार्ग बनविला आहे. २ ट्नेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला होता, तर १ ट्नेल बोरिंग मशीन स्वारगेट् येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.
दिनांक 22 जुलै 2021 रोजी कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग बनविणारे ट्नेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे पोहोचलं आहे. मेट्रो कामाच्या भाषेत यास 'ब्रेक थ्रू' असे म्हटले जातं.
पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण ट्प्पा आहे. दुसरे ट्नेल बोरिंग मशीन "मुळा" लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे
पुणे हे भारतातील चौथे शहर आहे जेथे भूमिगत मेट्रो मार्ग नदीच्या खालून जात आहे. याआधी मुंबई, कलकत्ता , आणि चेन्नई या महानगरािंमध्ये ट्नेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा बनविण्यात आला आहे.
मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे ३३ मीटर खोल असून, नदी पात्राच्या तळापासून साधारणतः १० मीटर खालून जात आहे. पुणे मेट्रोचे ६० ट्क्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रो ट्रेन चालवण्याची चाचणी १ वषांपूवी घेण्यात आली होती.
याच मार्गाचे ४ जुलै २०२१ रोजी कमिश्नर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांनी परीक्षण केले. त्यामुळे तेथे मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीच्या दिशेने सुरुवात झाली आहे.
मेट्रोची दुसरी मार्गिका जी कोथरूड येथून देखील मेट्रोची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली. जसे जसे काम पूर्नत्वकडे जाईल तशी वनाझ ते गरवारे पर्यंत मेट्रो चालवण्याची चाचणी घेण्यात येईल.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, 'महामेट्रो लवकरात लवकर पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी कटिबद्ध आहे.
मेट्रोची उभारणी अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, इतर सर्व शासकीय संस्थांच्या सहयोगामुळे आपण पुणेकरांच्या उस्फुर्त सहभागामुळे महामेट्रोने हा महत्वपूर्ण ट्प्पा पूर्ण केला आहे.
पुणे मेट्रोच्या अत्यंत कठीण अशा तांत्रिक व गुंतागुंतीच्या डिझाईनसाठी श्री. लिमये यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.