जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pune News : आता बसायला लागतंय! पुण्यात मिळतेय चक्क ‘बिअर’ आईस्क्रीम, कुठे आहे हा प्रकार? VIDEO

Pune News : आता बसायला लागतंय! पुण्यात मिळतेय चक्क ‘बिअर’ आईस्क्रीम, कुठे आहे हा प्रकार? VIDEO

Pune News : आता बसायला लागतंय! पुण्यात मिळतेय चक्क ‘बिअर’ आईस्क्रीम, कुठे आहे हा प्रकार? VIDEO

Pune News : पुण्यात आता चक्क बिअर आईस्क्रीम मिळतंय. काय आहे हा प्रकार पाहा स्पेशल रिपोर्ट

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 6 जून : उन्हाळा म्हंटलं की सर्वांनाच आईस्क्रीमची आठवण होते. अनेक भागात आईस्क्रीमची स्पेशल पार्लर सुरू होतात. या गर्दीमध्ये आपल्याकडील आईस्क्रीम हे इतरांपेक्षा वेगळं असावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील आजवर वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम खाल्ले असतील. पण, कधी बिअर आईस्क्रीम ट्राय केलंय? चक्रावलात ना? नावीन्यपूर्ण पदार्थ मिळणाऱ्या पुणे शहरात आता चक्क बिअर आईस्क्रीम देखील मिळू लागलंय. कसं आहे बिअर आईस्क्रीम? पुण्यातील एमआयटी कॉलेज जवळच्या जंजिरा हॉटेलजवळ तुम्हाला आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार खायला मिळतात. निर्मय पाटील या नुकत्याच बारावी पास झालेल्या 18 वर्षांच्या तरूणानं मंजिफेरा हा स्वत:चा स्टार्टअप सुरू केलाय. त्यामध्ये चोको ब्राऊनी, मोका आलमंड, यांच्यासह अगदी सोनपापडी आईस्क्रीम देखील इथं मिळतं. या सर्व प्रकारात  येथील बिअर आईस्क्रीमची सर्वात जास्त चर्चा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निर्मय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे संपूर्ण नॉन आल्कोहोलिक आईस्क्रीम आहे. यामध्ये फक्त बिअरचा फ्लेवर वापरला जातो. हा फ्लेवर होप्स या वनस्पतीपासून बनवण्यात येतो. ही कडवट वनस्पती असून यामधील कोणासारख्या असणाऱ्या भागाची चव ही बिअरसारखी असते. त्या भागाला विशिष्ट तापमानात उकळवले जाते. त्यानंतर त्यावर योग्य प्रक्रिया करुन बिअरचा फ्लेवर तयार केला जातो. शेगावची प्रसिद्ध कचोरी वेगळी कशी? तयार करण्याचा काय आहे फॉर्म्युला, पाहा खास VIDEO आम्ही सुरूवातीला बिअर आईस्क्रीम टेस्टर म्हणून नियमित ग्राहकांना देण्यास सुरूवात केली. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याची विक्री सुरू केली. या आईस्क्रीमला आता पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.’ मेंजिफेरामध्ये आईस्क्रीमप्रमाणेच मोहितो आणि जार्सही मिळतात.  मोहितोमध्ये याठिकाणी जामून, करवंद, मँगो, रॉ मंगो, आम्ला, रेड बेरी असे हटके प्रकार मिळतात. यामधील करवंद आणि जामून या मोहितोला तरूणांची जास्त पसंती आहे, असं निर्मयनं सांगितलं. ‘मेंजीफेरामधील मेन्यू हा सिझननुसार चेंज करण्यात येतो. त्यामध्ये ग्राहकांची आवड आणि मागणी याचा आम्ही प्रामुख्यानं विचार करतो. मेंजीफेरा हा आंब्याचे बायलॉजिकल नाव आहे, अशी माहितीही निर्मयनं यावेळी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात