मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील कोरोना शहीद पोलिसाचे कुटुंबीय गहिवरले, गृहमंत्र्यांचं पत्र घेऊन थेट पोलीस आयुक्त आले घरी

पुण्यातील कोरोना शहीद पोलिसाचे कुटुंबीय गहिवरले, गृहमंत्र्यांचं पत्र घेऊन थेट पोलीस आयुक्त आले घरी

पोलीस दलाच्या या संवेदनशीलपणामुळे शहिदाची पत्नी गहिरवल्याचं पाहायला मिळालं.

पोलीस दलाच्या या संवेदनशीलपणामुळे शहिदाची पत्नी गहिरवल्याचं पाहायला मिळालं.

पोलीस दलाच्या या संवेदनशीलपणामुळे शहिदाची पत्नी गहिरवल्याचं पाहायला मिळालं.

पुणे, 14 नोव्हेंबर : पुण्यातील शहीद पोलीस कुटुंबियांना पोलीस दलाकडून अनोखी भेट देण्यात आली आहे. शहीद पोलीस दिलीप लोंढे यांच्या कुटुंबियांना सेवाकाल असेपर्यंत पोलीस लाईनचमध्येच राहता येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: गृहमंत्र्यांचे पत्र पीडित कुटुबियांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केलं. पोलीस दलाच्या या संवेदनशीलपणामुळे शहिदाची पत्नी गहिरवल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावत असताना पोलीस पतीचे निधन झाले. पण पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले पत्र स्वत: पोलीस आयुक्त घेऊन आले. आपल्या पतीच्या कार्याप्रती पोलीस दलाने व्यक्त केलेलेल्या कृतज्ञतेमुळे शहीद पोलिसाचे कुटुंबीय गहिवरले. सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहणारे दिलीप लोंढे हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांचे दु:ख हलके करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पत्र दिलीप लोंढे यांच्या पत्नी उषा आणि केतन यांना सुपूर्द केले. यामुळे उषा लोंढे गहिवरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की, पोलीस दलाने दाखविलेल्या संवेदनेने जगण्याचे बळ मिळाले आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे आमची काळजी घेतली आहे. पोलीस दलातील सेवेसाठी आपल्याला मिळालेले शासकीय निवासस्थान सेवा कायम असेपर्यंत आपल्याकडेच राहील, असे आश्वासन गृह मंत्र्यांनी या पत्रामध्ये दिले आहे. संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास अमिताभ गुप्ता यांनी दिला. या वेळी प्रदीप देशमुख, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे , विनोद पवार उपस्थित होते.
First published:

Tags: Coronavirus, Pune, Pune poilce

पुढील बातम्या