पुणे, 1 सप्टेंबर : पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही संबंध देशात आकर्षणाचा विषय असते. पण यंदा Coronavirus च्या सावटाखाली साधेपणानेच बाप्पाला निरोप देण्यात आला. मानाचे पाचही गणपती आणि नंतर भाऊ रंगारी, दगडूशेठ, मंडई या सगळ्या प्रमुख गणपतींचं विसर्जन रात्री 8 च्या आत पार पडलं.