पुणे, 23 सप्टेंबर : दोन मुलांच्या निधनानंतर नैराश्येत असलेल्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Father commits suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील (Pune) नांदेड फाटा येथे ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. 40 वर्षीय वडिलांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे संजीव कदम (Sanjeev Kadam) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. संजीव कदम यांनी नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी संजीव कदम यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं.
संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुलांच्या निधानानंतर संजीव कदम हे नैराश्येत गेले होते.
ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींच्या बापाची चंदिगडमध्ये आत्महत्या
ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींची जबाबदारी असणाऱ्या बापाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. व्यसन एखाद्या व्यक्तीला कुठल्या थराला नेऊ शकतं, याचं उदाहरणच यातून दिसून आलं आहे. चिट्टा नावाच्या अंमली पदार्थाचं या व्यक्तीला व्यसन जडलं होतं. मात्र त्याच्याकडचे पैसे संपल्यामुळं हे महागडं ड्रग त्याला मिळू शकलं नाही. त्यामुळे त्याच्या मानसिक अवस्थेवर परिणाम झाला आणि देशी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली.
पुण्यातील तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेहपुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणी काही कामानिमित्त सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण ती नंतर परतलीच नाही. पण रात्रीच्या सुमारास हडपसर परिसरातील रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. पण सायंकाळी उशीरापर्यंत तिच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली. त्यानंतर प्रतिमाच्या नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा धाव घेत, प्रतिमा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.