मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात; फसवणुकीचा आरोप

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात; फसवणुकीचा आरोप

Photo: www.pscl.in

Photo: www.pscl.in

Pune builder detained by Mumbai Police: पुण्यातील प्रसिद्ध असलेले बिल्डर परांजपे बंधू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे, 24 जून: पुण्यातील प्रसिद्ध असलेले परांजपे बिल्डर (Paranjape Builders) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे. परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांच्या पथकाने पुण्यातून ताब्यात (Prajajape builders detained from Pune) घेतले आहे. या वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शशांक पुरुषोत्तम परांजपे आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेतले आहे. बनावट दस्तावेज तयार करुन गुंतवणुकदारांची फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणी मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जवळच्या नातेवाईकांनीच ही तक्रार केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांची टीम पुण्यात दाखल झाली आणि त्यानंतर त्यांनी परांजपे बिल्डर यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी विभागाचा दणका; 130 कोटींची खोटी देयके दिल्याप्रकरणी अटक

मुंबई पोलीस परांजपे बिल्डर्सला आता मुंबईत घेऊन येत आहेत. मुंबईत आल्यावर या प्रकरणी त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील बिल्डर अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

First published:

Tags: Crime, Pune