मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

LPG Gas Cylinder चा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, अशी होते तुमच्या सिलेंडरमधून गॅस चोरी, पाहा VIDEO

LPG Gas Cylinder चा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, अशी होते तुमच्या सिलेंडरमधून गॅस चोरी, पाहा VIDEO

घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

  • Published by:  Sunil Desale

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 3 सप्टेंबर : आधीच घरगुती गॅसच्या (Gas cylinder price hike) वाढत्या दरामुळे ग्राहक हैराण झाले असून त्यात भर पडली आहे दौंड (Daund Pune) मधील धक्कादायक प्रकाराने.. दौंड शहरात गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडून सिलेंडरमधून गॅस काढून रिकाम्या टाकीत भरला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाड टाकत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. (Police raid and detain 5 for stealing gas from cylinder)

दौंड शहरातील यादव वस्ती जवळ भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीमध्ये मशीनच्या सहाय्याने धोकादायक पध्दतीने गॅस भरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या टीमने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि चार 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 9 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये 24 वर्षे जुना मानवी सांगाडा सापडल्यानं खळबळ; जुन्या तक्रारी धुंडाळणार

पोलिसांनी घटनास्थळावरुन वाहने आणि 37 भरलेल्या टाक्या आणि 33 रिकाम्या गॅसच्या टाक्या जप्त केल्यात संबंधित टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मात्र दौंड शहरात खळबळ उडाली आहे. ही टोळी कशाप्रकारे भरलेल्या सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरच्या टाकीत गॅस काढून टाकत असत त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हे गॅस पुरवठा वितरक गॅस ग्राहकांना दोन किलो वजनाचा गॅस कमी देत असल्याने ग्राहकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि 5 जणांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime, Pune