पुणे, 11 ऑगस्ट: पुण्यात (Pune Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर पतीनं (Doctor Husband) डॉक्टर पत्नीचे केस (cutting wife hair) कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारलं असता पतीनं हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी डॉक्टर पतीला पोलिसांनी अटक (Arrested ) केली आहे.
ही घटना पुण्यातील धानोरी (Pune Dhanori area) भागात घडली आहे. 38 वर्षीय डॉक्टर रवी दिगंबर धादवड असं आरोपी पतीचं नाव आहे. पीडित पत्नी डॉ. पल्लवी रवी धादवड (37) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या डॉक्टर दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी देखील आहे. पाच वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं असून गेल्या दोन वर्षांपासून दोघंही मुंजाबावस्ती येथील तिरूपती रेसिडेन्सी येथे ते राहतात.
आजीनं केलेला अपमान जिव्हारी, तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर
रविवारी रात्री पत्नी पल्लवीनं पती रवीला बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी गावी जायचे आहे, असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात रवीनं पल्लवीला मारहाण केली. त्याच दरम्यान त्यानं चाकूने तिचे केस कापले. त्यानंतर त्याच चाकूनं पाठीवर आणि दंडावर हल्ला केला. या हल्ल्यात पल्लवी जखमी झाल्या.
या घटनेनंतर पल्लवी यांनी तक्रार दाखल केली. पत्नीच्या तक्रारीनुसार पती रवि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अधिक तपास करण्यात येत असल्याचे विश्रांतवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Pune news