मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांनो...कोरोनाबाबतच्या अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आयुक्तांच्या 'या' सूचनेला गांभीर्याने घ्या!

पुणेकरांनो...कोरोनाबाबतच्या अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आयुक्तांच्या 'या' सूचनेला गांभीर्याने घ्या!

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कडक शब्दांत नागरिकांनाही आवाहन केलं आहे.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कडक शब्दांत नागरिकांनाही आवाहन केलं आहे.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कडक शब्दांत नागरिकांनाही आवाहन केलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole
पुणे, 16 मार्च : पुण्यात काही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अफवांचा बाजार सुरू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसपेक्षा अफवांमुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यातून नागरिकांच्या हातून कायद्यांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत कडक शब्दांत नागरिकांनाही आवाहन केलं आहे. 'पॅनिक करू नका, आठवड्याच्या सामानाचा स्टॉक ठीक आहे, दोन दोन महिन्याची शिधा भरण्याची आवश्यकता नाही. दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नका,' अशी सूचना कडक शब्दांमध्ये प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मॉल्स, जिम, सिनेमागृह बंद आहेत की नाही ते तपासण्यासाठी पोलिसांची पथकं तपासणी करत आहेत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली. 'पुण्यात काही रिस्ट्रीक्शन नक्की असतील, बंधनं नक्की घातली जातील, त्याचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल, हे लक्षात घ्यावं. पोलीस आदेश निर्गमित करतील. पुणे सीपींसोबतही बोललो ते ही आदेश निर्गमित करतील. त्याचं पालन करावं,' असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या 16 एवढीच आहे. नवे 27 सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांची रोज तपासणी सुरू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. हेही वाचा- कोरोनाचे संशयित रुग्ण मारत होते लोकांसोबत गप्पा, सरकारने घेतला आता मोठा निर्णय 'पुण्यातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. फक्त प्रॉडक्शन युनिटचा प्रश्न असेल. आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत,' असं दीपक म्हैसेकर म्हणाले. तसंच आवश्यकतेनुसार काही भागात कलम 144 लागू केले जाईल. पण संचारबंदी असणार नाही, असंही ते म्हणाले.
First published:

Tags: Coronavirus disease, Pune news

पुढील बातम्या