मुंबई, 16 मार्च : कोरोना व्हायरसमुळे राज्यात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही 39 वर पोहोचली आहे. ज्या रुग्णांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आलं होतं, त्यांच्या हाताच्या डाव्या हातावर टॅग लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परदेशातून भारतात जे नागरिक आले होते. त्यातील रुग्णांना होम कॉरोंटाईन करण्यात आलं होतं. जेणे करून या लोकांनी घरात बसावं बाहेर जाऊ नये. परंतु, काही रुग्णांना घरी पाठवलं. त्यातील काही रुग्ण हे बाहेर इतर लोकांसोबत गप्पा मारत असल्याचं निदर्शनास आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे, ज्या रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे, त्यांच्या डाव्या हातावर टॅग लावणार, अशी माहिती आरोग्य सचिव अनुप कुमार यांनी दिली. एवढंच नाहीतर काही रुग्णांनी आपल्या घरचा चुकीचा पत्ता दिला आहे म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. ज्याला टॅग लावायचा नसेल त्याने 14 दिवस रुग्णालयातच राहावे, अशी सूचनाही अनुप कुमार यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसबद्दल आढावा बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. आपल्याकडे कोरोना व्हायरसची पातळी ही दुसऱ्या स्तरावर पोहोचली आहे. राज्यात अजून कोरोनामुळे तिसऱ्या स्तरावरची परिस्थिती पोहोचली नाही, अशी महत्त्वाची माहिती टोपे यांनी दिली. तसंच, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय, इंजिनिअर यासह वेगवेगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत असतील त्यांचे पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे त्या एप्रिल महिन्यात घेण्यात येतील, पुढील सुचना येईपर्यंत बंद राहणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात आगामी काळात महापालिका आणि ग्रामपंचायती निवडणुका येऊ घातल्या आहे. कोरोना व्हायरसची परिस्थितीत पाहत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात यावा असा निर्णय राज्य सरकारचा झाला आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला तशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.