Home /News /pune /

पुणेकरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या संख्येत वाढ

पुणेकरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या संख्येत वाढ

Pune Corona Virus: पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

    पुणे, 26 मे: सध्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना व्हायरस (Corona Virus) चा प्रार्दुभाव रोखण्याची लढाई सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर पुणे (Pune Corona) जिल्ह्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पुण्यात मंगळवारी 1 हजार 560 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी पुणे शहरात नव्यानं 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात सध्या एॅक्टिव्ह (Active Patients) रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 858 इतकी आहे. मंगळवारी 1 हजार 560 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आता एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 49 हजार 912 इतकी झाली आहे. तर काल एकाच दिवसात जवळपास 7 हजार 737 नमुने घेण्यात आलेत. त्यामुळे शहरातील एकूण टेस्ट संख्या 24 लाख 51 हजार 735 इतकी आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 868 रुग्णांपैकी 1, 032 रुग्ण गंभीर तर 2, 224 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेताहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्यानं 35 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात मृतांची एकूण संख्या 8 हजार 78 इतकी आहे. सोमवारी शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 85 दिवसानंतर म्हणजे जवळपास तीन महिन्यानंतर 500 च्या आत होती. मंगळवारी शहरातील रुग्णसंख्या एक मार्चच्या रुग्णसंख्येच्या जवळपास पोहोचली होती. सोमवारी केवळ 494 नव्या रुग्णांची भर पडली. त्याआधी 1 मार्चला 406 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 2 मार्चपासून रुग्णसंख्येनं पाचशेचा आकडा पार करत पुढे तो साडेसात हजारांपर्यंत पोहोचला होता. ही आकडेवारी पाहता पुणे शहर आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचं चित्र दिसत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Pune, Pune cases

    पुढील बातम्या