Home /News /pune /

पुणे : या गावातील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद

पुणे : या गावातील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल खैरे-जाधव व त्यांचे विद्यार्थी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

    पुरंदर, 19 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज 2 या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल खैरे-जाधव व त्यांचे विद्यार्थी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची निवड करण्यात आली होती. सदर कार्यक्रमासाठी गटविकासाधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड ,केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप,मंडल अधिकारी प्रभावती कोरे,आरोग्य विभाग प्रमुख बेलसर, जि.प.प्राथ.शाळा कुंभारवळण चे सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते. आढावा अहवालाच्या निमित्ताने गावाला मिळालेल्या मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून शितल खैरे-जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ऑनलाईन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केलं. तसंच मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. महानेटच्या माध्यमातून कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातील अडसर दूर होऊन विद्यार्थ्यांचा दर्जा नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आणि महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत काही सूचना असतील तर त्या आम्हाला शिक्षकांनी नक्की कळवा असं आवाहनही केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune (City/Town/Village), Purandar, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या