पुणे, 02 मार्च : पुण्यात आजचा निवडणूक निकालाच आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. चिंचवडमध्ये आतापर्यंत 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे पिछाडीवर आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली आहे. चिंचवडमध्ये आतापर्यंत आठव्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे. अश्विनी जगताप यांना 4929 मतं मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 2765 मतं मिळाली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 1052 मतं मिळाली आहे. त्यामुळे कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका बसला आहे. नवव्या फेरी अंती अश्विनी जगताप या ६ हजार ३५६ मतांनी आघाडीवर आहे. चिंचवड पोटनिवडणूक - नववी फेरी जगताप - 32288 काटे - 25922 कलाटे - 10705 या फेरीत 1473 चा लीड जगताप तर एकूण 6356 ची आघाडी आठवी फेरी जगताप - 4929 काटे - 2765 कलाटे 1052 चिंचवड विधानसभा एकूण मतं अश्विनी जगताप:- १३९३२ नाना काटे:- १२८३२ राहुल कलाटे:-४५९९ कसबा पोटनिवडणूक - एकूण मतं रवींद्र धंगेकर - 30527 हेमंत रासने - 27187 या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.