पुणे, 02 मार्च : पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये आमदार कोण? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी मजबूत आघाडी घेतली आहे. त्यामुळे रासने पुन्हा मागे पडले. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली आहे. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीपासून धंगेकर यांना 25904 मतं मिळाली आहे. तर रासने यांना 24633 मतं मिळाली आहे. आतापर्यंतची एकूण मतं रवींद्र धंगेकर - 25904 हेमंत रासणे - 24633 कसबा पोटनिवडणूक - सातवी फेरी रवींद्र धंगेकर - 2824 हेमंत रासने - 4270 -—————— 5 वी फेरी धंगेकर 3 हजार मतांनी आघाडीवर -—————– 4 फेरी मतं 4393 धंगेकर 3111 रासने 2334 मतांनी धंगेकर आघाडीवर -——————- चौथ्या फेरीचा अंतिम टप्प्यात धंगेकर २३३४ मतांनी आघाडीवर कसबा पोटनिवडणूक तिसरी फेरी रवींद्र धंगेकर - 11157 हेमंत रासने - 10673 -——————– कसबा पोटनिवडणूक दुसरी फेरी कसबा विधानसभा रविंद्र धंगेकर: ८६३१ हेमंत रासने: ६९६४ -—————————— कसबा पोटनिवडणूक पहिली फेरी - रवींद्र धंगेकर - 5844 हेमंत रासने - 2863 अभिजीत बिचुकले: 04 आनंद दवे : 12 नोटा: ८६ -————————– पिंपरी चिंचवड - पाचवी फेरी - एकूण मते - अश्विनी जगताप - ३३५० भाजप - ४९९ ची लीड एकूण - २९२८ - नाना काटे -२८११ एनसीपी - राहूल कलाटे - ११६७ अपक्ष - तर चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीतही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर भाजप उमेदवार अश्विनी जगताप - 7996 महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे - 7349 अपक्ष उमेदवार राहुल कलाटे - 3046 -——— चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक - दुसरी फेरी भाजप 3829 ncp 3692 अपक्ष-1372 दुसऱ्या फेरी मध्ये अश्विनी जगताप 676 मतांनी आघाडी वर -——————– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक - पहिली फेरी अश्विनी जगताप 4053 नाना काटे 3604 राहुल कलाटे 1273 या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.