Home /News /pune /

PUNE : RTE अंतर्गत शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली लाच; पुण्यातील गट शिक्षण अधिकाऱ्याला अटक

PUNE : RTE अंतर्गत शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली लाच; पुण्यातील गट शिक्षण अधिकाऱ्याला अटक

RTE (Right To Education) मार्फत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच मागण्यात आली होती.

पुणे, 1 सप्टेंबर : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील एका गट शिक्षणअधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. यामध्ये या शिक्षण अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. (Bribe for admission to school under RTE Group education officer arrested ) रामदास वालझडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. RTE (Right To Education) मार्फत शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यानुसार सापळा रचत 50 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वीदेखील पुण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. बातमी अपडेट होत आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Education, Pune, RTE

पुढील बातम्या