पुणे, 24 जून : पुण्यातील (Pune) आंबिलओढा (ambil odha slum) परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु, आता स्थानिकांना पुणे न्यायालयाने (pune court) मोठा दिलासा दिला आहे. पुणे पालिकेच्या तोडकामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्थानिकांनी तुर्तास सुटकेचा श्वास सोडला आहे.
आंबिल ओढा परिसरात असलेल्या अनधिकृत घरांवर पुणे पालिकेकडून तोडकामाला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद चिघळला होता. त्यामुळे पोलीस आणि स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने स्थानिकांची बाजू घेत तुर्तास तोडकामाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थानिकांनी एकच जल्लोष साजरा केला.
12 वीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना महत्त्वाचे निर्देश
दरम्यान, अतिक्रमण कारवाईमध्ये आतापर्यंत 130 कुटुंबांना हटवण्यात आले. कारवाई करून बाहेर काढलेल्या 130 कुटुंबांपैकी 81 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था राजेंद्रनगरच्या एसआरए कॉलनीमध्ये करण्यात आली आहे. सुमारे 81 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाचा करारनामा करण्यात असून तातडीने बांधकाम व्यावसायिकांकडून करून देण्यात आला.
पुढे जाण्यास साईड न दिल्यानं एसटी चालकाला मारहाण; महिला कंडक्टरला नेलं फरफटत
उर्वरित सुमारे 50 कुटुंबांनी बांधकाम व्यावसायिकाकडून भाडं घेऊन आपल्या पसंतीने जागा शोधून राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी ज्या कारवाईने मोठा आक्रोश तयार झालेला होता. दुपारपर्यंत प्रशासनाने अत्यंत वेगवान हालचाली करून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवली होती. कारवाई जवळपास पूर्ण केली आहे. आता आंबिल ओढा सरळ करण्याचे काम आणि एसआरएच्या इमारतीच्या बांधकामालासुरुवात केली जाणार आहे. या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 130 कुटुंबीयांना तिथे घर देण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.