जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार

पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार

पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार

पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 5 एप्रिल : लॉकडाऊनच्या कालावधीत तिसऱ्यांदा वाढ केल्यानंतर राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार झाली आहे. यामध्ये तब्बल 15 हजार 502 जणांची माहिती जमा झाली आहे. एकूण 17 राज्यातील परप्रांतीय मजुरांचा या यादीत समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील मजूरांची गावी जाण्याची करणार सोय करण्यात येणार आहे. दोन दिवसात प्रशासन याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती आहे. या घडामोडींमुळे रोजगार नसताना इथं अकडलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कालच पुण्यात परप्रांतीय मजुरांवर लाठीचार्ज करण्याची वेळ पोलिसांवर आली होती. पुण्यात काल काय घडलं? वारजेतील मजूर अड्ड्यावर घरी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. कालपासून देशभरातील दुसरा लॉकडाऊन संपला असून तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. हेही वाचा - हिंगोलीतून धक्कादायक बातमी, CRPF जवानांनी मुंबईत दिला कोरोनाला लढा, पण गावी पोहोचल्यावर… अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात