पुण्यातील बुधवार पेठेत करत होती देहविक्री.. पतीने केली निर्घृण हत्या?

पुण्यातील बुधवार पेठेत करत होती देहविक्री.. पतीने केली निर्घृण हत्या?

महिला बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होती. या वादातून पतीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • Share this:

पुणे, 14 ऑगस्ट- बुधवार पेठेत एक महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवार पेठेत जुना बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर बुधवारी सकाळी 7 वाजता ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. महिला बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होती. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शबनुर रईस अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. ती मागील काही महिन्यांपासून बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होती. यावरून पतीसोबत तिचे कायम भांडण होत होते. या वादातून पतीने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इनामुल्ल मलीक शेख (वय-32) असे आरोपीचे नाव असून तो पसार झाला आहे. इनामुल्ल मलीक शेख हा बांग्लादेशाचा नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पतीच्या गैरहजेरीत राहत्या घरातच सेक्स रॅकेट चालवत होती पत्नी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सेक्स रॅकेटशी संबंधित काही लोकांनी नागरी वस्तीत देहविक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती उजेडात आली आहे. अशाच एका रॅकेटशी संबंधित महिलेला कांदिवली क्राइम ब्रॅंचने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. धक्कादायक म्हणजे ही महिला पती आणि मुलीच्या गैरहजेरीत देहविक्री करत होती. विमा एजेंट बनून ग्राहकांना आपल्या घरी बोलवत होती.

काय आहे हे प्रकरण?

Loading...

काही दिवसांपूर्वी एका खबरीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी या महिलेबाबत टीप दिली होती. यानंतर पोलिसांनी काही दिवस महिलेवर पाळत ठेवली. पोलिस निरीक्षक आनंदराव राणे, शरद झीने, नितिन उतेकर आणि रईस शेख यांच्या पथकाने महिला राहत असलेल्या परिसरात मॉनिटरिंग केले. दोन दिवसांपूर्वी क्राइम ब्रॅंचला व्हॉट्सअॅपवर तीन मुलींचे फोटो देखील आले होते. हे फोटो महिलाने आपल्या जुन्या ग्राहकांना पाठवले होते. यानंतर कांदिवली क्राइम ब्रॅंचने महिलेच्या घरी छापा टाकून महिलेला अटक केली. महिलेच्या घरात चार मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. त्यांची रवानगी सुधार गृहात करण्यात आली आहे. तीन पैकी दोन मुली मालाड तर एक मालवणी आणि एक नालासोपारा येथील आहे.

विमा एजेंट बनून ग्राहकांना बोलवत होती घरी...

महिलेचे दोन बेडरूमचे घर आहे. पोलिसांनी महिलेला अटक केल्याने तिचा पती आणि मुलीला मोठा धक्का बसला आहे. कारण, ही महिला पती आणि मुलीच्या गैरहजेरीत राहत्या घरात सेक्स रॅकेट चालवत होती. क्राइम ब्रॅंचच्या एका अधिकारीने सांगितले की, पती नोकरी करत असल्याने तो सकाळीच घराबाहेर पडत होता. मुलगा 12 वीला आहे. ती सकाळी 11 वाजता कॉलेजात जात होती. नंतर कोचिंगला जात होती. त्यामुळे दिवसभर कोणीच घर राहत नव्हते. महिलेने याच गोष्टीचा फायदा घेतला. दिवसा फ्लॅटमध्ये ग्राहक आणि मुलींना बोलवून घेत होती.

बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डने याबाबत चौकशी केल्यास हे लोक इंश्युरन्स पॉलिसी घेण्यासाठी येत असल्याची ती सांगत असे. विशेष म्हणजे महिला ग्राहकांना वेगवेगळ्या वेळेत ग्राहकांनी बोलवत होती. एका ग्राहकाकडून ती 3000 हजार रुपये घेत होती. त्यातील 50 टक्के रक्कम स्वत: ठेऊन उर्वरित 50 टक्के मुलींना देत होती. याप्रकरणी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 370 (3, 4, 5) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अन्वये अटक केलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2019 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...