मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील 9 वीच्या पुढील सर्व वर्ग आणि खाजगी क्लासेस उद्यापासून सुरू होणार

पुण्यातील 9 वीच्या पुढील सर्व वर्ग आणि खाजगी क्लासेस उद्यापासून सुरू होणार

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 9 वी पासून पुढील वर्ग उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेनं घेतला आहे.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 9 वी पासून पुढील वर्ग उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेनं घेतला आहे.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 9 वी पासून पुढील वर्ग उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेनं घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 11 जानेवारी: कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा (corona pendemic) मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. 18 मार्चपासून देशातील अनेक शाळा आणि महाविद्यालये (Schools and Colleges) बंद होते. आता हळूहळू काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरुळीत करण्यात आली आहेत. या अनुषंगाने पुणे महानगर पालिकेने (मनपा) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून पुणे महानगर पालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 9 वी पासून पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेनं घेतला आहे. याबाबतचं परिपत्रक काढून  पुणे महानगर पालिकेने ही माहिती दिली आहे.

त्यामुळे 18 मार्चपासून बंद असलेले पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था अखेर पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी अनलॉक नियमांच पालन करावं लागणार आहे. शिवाय खाजगी क्लासेस सुरू करताना सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश  पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

क्लासेस सुरू होणार असल्याने कोचिंग व्यावसायिक आणि शिक्षकांमध्ये उत्साह

गेल्या दहा महिन्यांपासून खाजगी क्लासेस बंद होते. याचा आर्थिक फटका कोचिंग व्यवसायिकांना बसला आहे. क्लास भरवण्याच्या ठिकाणाचं भाडं भरावं लागल्यामुळे अनेक खाजगी कोचिंग व्यवसायिक कर्जबाजारी झाले होते. या निर्णयामुळे पुन्हा एकदा कोचिंग क्लासेस सुरू होणार असल्याने कोचिंग व्यवसायिक आणि शिक्षकांमध्ये उत्साह आहे.

खाजगी कोचिंग क्लासेसना खालील नियम पाळणं बंधनकारक आहे

1. कोचिंग क्लासला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी

2. मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

3. सर्व संस्थांमधील शिक्षण आणि कर्मचाऱ्यांची कोविड- 19 साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक राहील

4. सदर संस्थांनी प्रवेशद्वारावर सॅनिटाइजर मशीन उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.

5. दोन विद्यार्थ्यांमधील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Pune Muncipal corporation, School