Home /News /pune /

आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण- संजय राठोड यांच्या 90 मिनिटं संभाषण, पुणे पोलिसांच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण- संजय राठोड यांच्या 90 मिनिटं संभाषण, पुणे पोलिसांच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

Pooja Chavan suicide Case: पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्येप्रकरणी (suicide) तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे.

    पुणे, 02 जुलै: पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्येप्रकरणी (suicide) तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. 22 वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून पुणे पोलिसांनी (Pune Police ) महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. या पुराव्यात कॉल रेकॉर्डिंग आढळून आल्याचं समजतंय. यात पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड (former Maharashtra minister Sanjay Rathod ) यांचं संभाषण आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूर्वीचे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. धक्कादायक म्हणजे त्यातील एक संभाषण जवळपास 90 मिनिटाचं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. अनिल देशमुखांवर आज ईडीसमोर हजर राहणार? कठोर कारवाईची शक्यता 7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेत. या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत आहे. सध्या पोलीस हे संभाषण ट्रान्सलेट करुन घेताहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Pooja Chavan, Pune police, Sanjay rathod, Sucide case

    पुढील बातम्या