News18 Lokmat

'माझ्यावर प्रेम करता पण...', पोलीस पत्नीने चिमुकल्याचा खून करून स्वत: केली आत्महत्या

पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या चिमुकल्याचा जीव घेत स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2018 01:18 PM IST

'माझ्यावर प्रेम करता पण...', पोलीस पत्नीने चिमुकल्याचा खून करून स्वत: केली आत्महत्या

हलिमा कुरेशी , प्रतिनिधी

पुणे, 22 डिसेंबर : पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या चिमुकल्याचा जीव घेत स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासूच्या छळास कंटाळून एका पोलीस पत्नीने आपल्या 2 वर्षांच्या कोवळ्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मगरपट्टा हडपसर इथं शनिवारी सकाळी 5 वाजल्याच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा कसून शोध घेत आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात काम करणारे पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी जान्हवी (वय २२) हिने आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या कोवळ्या शिवांश या मुलाचा खून करून, ओढणीच्या साहाय्याने फॅनला लटकून स्वतः आत्महत्या केली आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये 'पती, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र मला वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव. माझी सासू सुजाता माझा वारंवार छळ करते.' असं लिहण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे हडसर परिसर हादरला आहे. तर पोलिसांनी जान्हवी आणि शिवांशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर यात पोलीस आता आणखी तपास करत आहे.

Loading...


VIDEO : याला काळीज नसावच, आधी गाडीने दांपत्याला उडवलं, नंतर पळून जाताना पुन्हा चाकाखाली चिरडून निघून गेला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...