• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • CCTV: पिंपरी चिंचवडमधील थरारक घटना, लोखंडी रॉडने मॅनेजरची हत्या

CCTV: पिंपरी चिंचवडमधील थरारक घटना, लोखंडी रॉडने मॅनेजरची हत्या

Pimpri Chinchwad manager killed by rod: एका मॅनेजरची लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या झाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे.

  • Share this:
पिंपरी चिंचवड, 12 ऑगस्ट : एका तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन हत्या (man killed by iron rod) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)मध्ये घडला आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Caught in CCTV) झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. पिंपरी -चिंचवडच्या चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नानेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीचा मॅनेजर अमोल गजानन राणे याची हत्या झाली आहे. अनैतिक विवाह बाह्य संबंधातून झाल्याच स्पष्ट झालं आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टोळक्यानं घेतला तरुणाचा जीव; पिंपरीतील शहराध्यक्षाला अटक अमोल राणे याच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ते फूटेज पोलिसांच्या हाती लागेल आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे की, भवानी इंडस्ट्रीतील कामगार रामेश्वर वामन पवार हा अमोल राणे याला लोखंडी रॉडणे मारत आहे. आरोपी रामेश्वर पवार याच्या बायकोचे अमोल राणे यांच्याशी अनैतिक विवाह बाह्य संबध आसल्याचा संशय रामेश्वर पवार याला होता. याच संशयातून रामेश्वर पवार याने अमोल राणे याचा लोखंडी रॉडने मारून खून केला. पत्नीवर सुद्धा जीवघेणा हल्ला त्यानंतर रामेश्वर ने आपली पत्नी हिला देखील लोखंडी टेबलने मारून खून करण्याचा प्रयत्न केला असं पोलीस तापसात निष्पन्न झालं आहे. रामेश्वर पवार हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून चाकण पोलिसांनी रामेश्वरला अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर गावातून अटक केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: