पिंपरी चिंचवड, 04 जुलै : गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशात पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने कोयते आणि पालघनच्या सहाय्याने जिम ट्रेनर तरुणावर वार करून त्याचा खून केला आहे. काल रात्री ही घटना चिंचवड इथं घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
21 वर्षीय प्रेम लिंगदाळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मॅडी मडिवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, योगेश फुरडे, दीपक कोल्हे, सागर परीट, अनंत साठे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. तर या प्रकरणी किरण चव्हाण, दीपक कोल्हे, अनंत साठे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
'राज्याच्या तिजोरीत खळखळाट, कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकार घेणार कर्ज'
पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद हेळवे आणि आरोपी मॅडी मडिवाल हे दोघे जण एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. हेळवे व त्याच्या साथीदारांनी आरोपी मॅडी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या रिक्षाचीही तोडफोड केली.
याचा राग मनात धरून आरोपी मॅडी व त्याचे साथीदार हे कोयते व पालघन घेऊन बळवंतनगर इथे आले. आरोपी आल्याचे पाहताच फिर्यादी शिवानंद आणि त्याचे इतर साथीदार पळून गेला. मात्र त्यांच्या हाताला प्रेम लिंगदाळे हा तरूण लागला. आरोपींनी त्यांच्यावर कोयते व पालघरने वार केले.
राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन
याबाबतची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या प्रेम यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.