Home /News /news /

6 कोटींसाठी मुंबईकरांचा जीव घातला धोक्यात, अग्निशमन दलातील 121 महत्वाची पदं रद्द

6 कोटींसाठी मुंबईकरांचा जीव घातला धोक्यात, अग्निशमन दलातील 121 महत्वाची पदं रद्द

का मुंबईकरांचा जीव धोक्यात घातला जातोय? का रद्द केली गेली मुंबई अग्निशमन दलातील 121 महत्वाची पदं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालिकेला आपल्या करदात्यांना द्यावीच लागणार आहे.

मुंबई, 28 ऑगस्ट : थोडेसे पैसे वाचवण्यासाठी मुंबई मनपा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं समोर आलं आहे. कारण, वारंवार आग लागणं, इमारती पडणं अशा ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचणारा फर्स्ट रेस्पोंडिंग ऑफिसरची 121 पद्धत महापालिकेनं रद्द केली आहे. यामुळे मुंबईकरांच्या जीवाचा धोका आणखी वाढणार हे नक्की. 6 कोटी रुपये महत्वाचे की आयुष्य? मुंबई मनपाला मुंबईकरांच्या जीवाशी देणंघेणं नाही का? का मुंबईकरांचा जीव धोक्यात घातला जातोय? का रद्द केली गेली मुंबई अग्निशमन दलातील 121 महत्वाची पदं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पालिकेला आपल्या करदात्यांना द्यावीच लागणार आहे. गुरुवारी शुक्लाजी स्ट्रीटवर इमारतीचा भाग पडल्यानंतर आतमध्ये जेसीबी मशीन किंवा अग्निशमन दलाची गाडीही जाऊ शकत नाही. अशा चिंचोळ्या गल्ल्या असुदे किंवा गगनचुंबी इमारतीला लागलेली आग असुद्या. अग्निशमन दलाचा सहाय्यक केंद्र अधिकारी म्हणजेच फर्स्ट रेस्पॉंडिंग ऑफिसर त्वरित आपल्या टीमसह पोहोचतो आणि अंदाज घेतो की किती मोठी दुर्घटना आहे, कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल आणि टीमनं काम कसं करायचं? पण आता हे रेस्पॉंडिंग ऑफिसरच भरले जाणार नाहीत. कारण, अग्निशमन दलाने 6 कोटी रुपये वाचवण्यासाठी या पदांची मान्यता रद्द केली आहे. मग घटनास्थळी कोण पोहोचणार? असा सवाल उपस्थित होतो. 'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप खरंतर, हे तेव्हा उघड झालं जेव्हा 40 वरिष्ठ केंद्र अधिकारी या पदाची भरती सुरू करणयात आली. असं कोणतंही पद अग्निशमन दलाच्या पदतालिकेत नमूद नसल्याने आर्थिक बोजा का वाढवता? या युनियनच्या प्रश्नावर पालिकेचं उत्तर आलं. त्यासाठी 121 सहाययक अग्निशमन अधिकाऱ्यांची पदंच रद्द करण्यात आली आहेत. तर हे 2016 साली तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांच्या समतीनंतर झालं आहे. ज्याची अंमलबजावणी आता केली जात आहे. या पदांच्या समाप्तीनंतर पालिकेचे 6 कोटी, 39 लाख, 30 हजार 778 रुपये वाचणार आहेत. मुंबई अग्निशमन दलापुढे मोडकळीस आलेल्या इमारती, पुरप्रवण क्षेत्रातील घरं, गगनचुंबी इमारतीत लागणाऱ्या आगी, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या लोकांची सुरक्षितता, मुळं कमकुवत झालेली जीर्ण झाड अशी अनेक आव्हानं आहेत. अशात अधिकाधिक मनुष्यबळाची गरज असताना मनुष्यबळ कमी का केलं जातं आहे? Me Too च्या आरोपांमुळे सुशांत जास्त दुखावला होता; रियाने फेटाळले आपल्यावरील आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला सल्लागार म्हणून नेमलेल्या सुधीर नाईकांनी हा प्रस्ताव त्याकाळी परस्पर प्रशासनाकडून संमत करून घेतला. आणि प्रशासनिक पदं वाढवली ज्यांच्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करण्याशी काही संबंध नाही. 2 कोटी मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार ना पालिकेला आहे ना आयुक्तांना. अवघ्या 6 कोटी रुपयांची बचत करताना पालिकेने किती-किती आणि कशा-कशावर पैसे उधळले तेही आठवलं असतं तर असा प्रस्तावच तयार केला नसता. त्यामुळे आताच्या आयुक्तांनी 6 कोटी रुपये की 2 कोटी मुंबईकरांचा आयुष्य, काय महत्वाचं आहे हे ठरवावं.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या