जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पवारांचे कट्टर समर्थक राहुल कुल कसे बनले विरोधक! राऊतांच्या आरोपांमुळे चर्चेत

पवारांचे कट्टर समर्थक राहुल कुल कसे बनले विरोधक! राऊतांच्या आरोपांमुळे चर्चेत

पवारांचे कट्टर समर्थक राहुल कुल कसे बनले विरोधक!

पवारांचे कट्टर समर्थक राहुल कुल कसे बनले विरोधक!

दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर थेट संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 13 मार्च : दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत. अनेकजण कोण हे राहुल कुल? असा प्रश्न विचारू लागलेत. कधीकाळी पवारांचे कट्टर समर्थक असलेलं घराणं सध्या कट्टर विरोधक मानलं जात आहे. राहुल यांच्या राजकीय प्रवासावरचा हा स्पेशल रिपोर्ट. दौंडचे भाजप आमदार एवढीच त्यांची सध्याची राजकीय ओळख असली तरी कधीकाळी हेच कुल घराणं बारामतीच्या पवारांचं कट्टर समर्थक होतं. आमदार राहुल कुल यांचे वडील सुभास कुल हे 1990 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतरच खऱ्या अर्थाने शरद पवार आणि कुल कुटुंबाची जवळीक वाढली. पुढे 1999 मध्ये कुल यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा आमदारकी मिळवली. पण सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली. त्याही दोनदा आमदार बनल्या. 2009 मध्ये मात्र, राष्ट्रवादीने रंजना कुल यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव राहुल कुल यांना संधी दिली. पण त्या निवडणुकीत रमेश आप्पा थोरात यांनी बंडखोरी करून राहुल कुल यांना पाडलं. वाचा - म्हात्रे प्रकरणात कुणाचा हात? नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट याच निवडणुकीत राष्ट्रवादीने बंडखोराला आतून पाठिंबा दिल्याचा आरोप केला तिथपासूनच खऱ्या अर्थाने कुल कुटुंबं राजकीय दृष्ट्या बारामतीकरांपासून दूर तर रमेश थोरात हे अजित पवारांच्या आणखी जवळ गेले. त्याचीच परिणिती मग 2014 साली राहुल कुल यांनी राष्ट्रवादीपासून कायमची फारकत घेतली आणि महायुतीकडून राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि दौंडची आमदारकी पुन्हा कुल घराण्यात खेचून आणली. तेव्हापासून दौंडच हे कुल घराणं भाजपच्या जवळ गेलं. पुढे 2019 च्या लोकसभेला तर फडणवीसांच्या आग्रहाखातर राहुल कुल यांनी थेट आपली पत्नी कांचन कुल यांना थेट सुप्रिया ताईंच्याच विरोधात उभं केलं. ते स्वत: देखील दौंडमधून भाजपच्या कमळावर आमदार बनले.

News18लोकमत
News18लोकमत

असं म्हणतात की राहुल यांचं लग्न देखील सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नीने जुळवलं होतं. पण 2019 साली याच कुल कुटुंबाने थेट बारामतीकरांच्या लेकीच्याच विरोधात राजकीय उमेदवारी करून आपली पुढची राजकीय वाटचाल निश्चित केलीय. त्यामुळेच बारामती शेजारच्या दौंडचं राजकारण भविष्यात नेमकं कोणत्या वळणावर जातंय? हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात