पुणे 05 मे: वाईन शॉप्सला परवानगी दिल्यानंतर सर्व देशभर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यात नियम कडक करण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लिकरशॉप सुरू केलेत पण नियमांच पालन होत नसल्याचं दिसून येत आहे. नियमांचं पालन झालं नाही तर आम्ही थेट विक्रीचे परवाने रद्द करायची कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, वाईनशॉपला जाताना गाडी वापरली तर कारवाई केली जाईल. त्यामुळे दारू घ्यायला आता पायीच जाव लागणार आहे. रस्त्यावर येणारी वाहन कुठली हे पोलीस आणि जिल्हा प्रशासन म्हणजे आम्हीच ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुणे विभागातून वेगवेगळ्या राज्यात स्थलांतरित होण्यासाठी मजूर विद्यार्थी कामगार यांच्याकडून मोठी मागणी आहे. 1200 जण जायला तयार असतील तर रेल्वे गाडी सोडायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही गाडीमध्ये कुठेही थांबणार नाही असंही ते म्हणाले. मध्यप्रदेश वगळता कुठल्याही सरकार ने मजूरांच्या प्रवासाचे पैसे द्यायची तयारी दाखवलेली नाही. केवळ सरकारी वैद्यकीय तपासणीचं सर्टिफिकेट नाही तर खाजगी डॉक्टरांचही वैद्यकीय तपासणीच सर्टिफिकेट चालणारा आहे. ज्यांना लक्षणे दिसत असतील त्यांचीच चाचणी केली जाणार आहे. सर्वांच्या कोव्हिड टेस्ट करणं शक्य नाही अशी माहितीही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या मंगळवारचे भाव लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 माणसांनाच परवानगी, गृहमंत्रालयाचे नवे नियम बापरे! देशात 24 तासांत सर्वात जास्त 3900 नवे रुग्ण आणि 195 जणांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.