नवी दिल्ली 05 मे: लॉकडाऊन संपायला वेळ असला तरी सरकारने काही नियमांमध्ये सुट द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन 3.0 हा 17 मे रोजी संपणार आहे. लॉकडाऊन किती काळ ठेवावा यालाही मर्यादा असल्याने सरकारने थोडी सूट द्यायला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने आज नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार काही अटींवर लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी दिली. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
To maintain social distancing, gathering of not more than 50 persons are allowed at wedding functions and not more than 20 persons at last rites of deceased persons: Punya Salila Srivastava, Joint Secretary, Ministry of Home Affairs (MHA) #COVID19 pic.twitter.com/S2VnxxxZRv
— ANI (@ANI) May 5, 2020
तिकडे अमेरिकेतही कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. अमेरिकेत 1 जूनपर्यंत कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृतांची संख्या प्रत्येक दिवशी 3000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यापुढे दिलेल्या अहवालानुसार बाधितांचा आकडा एका दिवसाला 2 लाखापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘ते योद्धे होते, मी रडणार नाही’; शहीद आशुतोष शर्मा यांच्या पत्नीने दिला मुखाग्नी अंतर्गत मसूदा अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात अमेरिकेतील अनेक राज्यांनी आपली अर्थव्यवस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोमवारपर्यंत 12 लाखांहून अधिक अमेरिका नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तर मृतांची संख्या 69000 हून अधिक झाली आहे. याशिवाय 3 कोटींहून अधिक अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारी भत्त्यांची मागणी केली आहे.