Home /News /pune /

26 जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही 'तुरुंग' पाहता येणार; गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

26 जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही 'तुरुंग' पाहता येणार; गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

आतापर्यंत केवळ टीव्हीतून तुम्ही जेल पाहिलं असेल, मात्र नव्या योजनेतून तुम्हाला आतूनही तुरुंग पाहता येणार आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगापासून या योजनेची सुरुवात होणार आहे.

    मुंबई, 23 जानेवारी : शाळा, कॉलेज, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ऐतिहासिक ठिकाणं पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशात पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात येणार आहे. (Now the common man can see the prison ) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची घोषणा केली. राज्यात प्रथमतः जेल पर्यटन सुरु करीत असल्याचं सांगितलं. यामुळे विद्यार्था आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कारागृह हा समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे. हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही, तसेच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य तो काळजी घेईल. तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल.(Now the common man can see the prison ) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. ते यावेळी म्हणाले की, सध्या राज्यात 60 कारागृह आहेत. यामध्ये साधारण 24 हजार कैदी आहेत. तर 3 हजार कैदी हे तात्पुरत्या तुरुंगात आहेत. या जेल पर्यटनाची सुरुवात 26 जानेवारीपासून केली जाणार आहे. याला सर्व शैक्षणिक स्तरातून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. हे ही वाचा-मुंबई पोलिसांची अशीही आयडिया, गुन्हा केल्यास भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याऱ्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल. येरवडा कारागृह हे पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anil deshmukh, Yerwada jail

    पुढील बातम्या