मुंबई पोलिसांची अशीही आयडियाची कल्पना, गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!

मुंबई पोलिसांची अशीही आयडियाची कल्पना, गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!

मुंबई पोलिसांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे ज्यामुळे गुन्हेगारीला आळा तर बसलेच पण गुन्हेगारांनी ही चाप बसेल.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी (Mumbai police) तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15  ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा लागणार आहे.

छोट्या मोठ्या भुरट्या चोरांपासून ते अगदी अंडरवर्ल्ड डाॅन या मुंबईने पाहिलेत. त्यामुळे गुन्हेगारांची राजधानी “मुंबई” अशी एक ओळख मुंबईची आहे. ही ओळख पुसली जावी याकरता मुंबई पोलीस सतत प्रयत्नशिल असतात. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे ज्यामुळे गुन्हेगारीला आळा तर बसलेच पण गुन्हेगारांनी ही चाप बसेल. याकरता मुंबई पोलिसांनी सुरू केले आहे “मिशन बाॅंड”.

मुंबईत 94 पोलीस स्टेशन आहेत. या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांची संख्या काही कमी नाही. कारण मुंबईतील गुन्हेगार सुद्धा सतत काही ना काही नवीन युक्ती वापरुन गुन्हे करत असतात. हे आव्हान मुंबई पोलीस यशस्वीपणे निभावतात यांत काही शंका नाही. पण गुन्हेगारांचा बिमोड करुन मुंबईकरांना सुरक्षित वातावरणात जगता यावे याकरता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसत “मिशन बाॅंड” हाती घेतले आहे.

काय आहे मुंबई पोलिसांचे मिशन बाॅंड ?

- मुंबईमध्ये 94 पोलीस स्टेशन आहेत

- प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील 'टॉप 25' गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली

- चांगलं वर्तन करण्यासाठी या सर्व टाॅप 25 गुन्हेगारांकडून एक बॉण्ड मुंबई पोलीस भरून घेत आहे

- एकदा का या बाॅंडवर त्या गुन्हेगाराचे सही केली आणि त्याने एखादा गुन्हा केला किंवा त्याचा कुठल्या गुन्ह्यात सहभाग आढळला तर त्याने सही केलेला 25 हजार ते 50 लाख रुपयांचा बाॅंडचा भंग म्हणून त्याला दंड होईलच पण कारावास देखील होईल

- कारण बॉण्डमध्ये 25 हजार ते 50 लाखपर्यंत रक्कम वसूल करण्याची तरतूद करण्यात आली

- ही रक्कम आधी 5 हजार होती मात्र रक्कम कमी असल्यामुळे काही फारसा फरक पडला नाही

- 94 पोलीस स्टेशनमधून 3 हजार 043 गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली

- अशा यांद्यांवर  स्थानिक पोलीस, उपायुक्त लक्ष ठेवणार

आता हा बाॅंड कसा भरुन घेतला जाते आणि कोणत्या आरोपीला किताचा बाॅंड असेल हे पुढील प्रमाणे ठरवले जाईल. गुन्हेगाराची पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते, त्याची संपत्ती किती आहे याची माहिती घेतली जाते. बॉण्ड मधील रक्कमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे. त्याची आर्थिक परिस्थितीची सुद्धा चाचणी केली जाईल. मुंबई पोलिसांनी बाॅंडची रक्कम 25 हजार ते 50 लाख रुपये केल्याने गुन्हेगारांना अशीच धडकी बसली आहे. त्यामुळे गुन्हेगार आता गुन्हा करताना 10 वेळा विचार करतील. मुंबई पोलिसांच्या या मोहिमेतून एखाद्या जरी वाल्याचा वाल्मिकी झाला तरी मुंबई पोलिसांचे प्रयत्न यशस्वी होतील आणि गुन्हेगारीचा बिमोड होईल.

Published by: sachin Salve
First published: January 22, 2021, 6:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या